पिंपरी-चिंचवड : नाशिक फाटा परिसरातील शासकीय स्वच्छतागृह रात्री ९ ते १० नंतर बंद राहत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः रात्रीच्या प्रवासासाठी ट्रॅव्हल बसची प्रतीक्षा करणाऱ्या महिला व नागरिकांना स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध होत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत (Passenger Convenience)आहे.
परिसरात बार तसेच रात्रीची वर्दळ असल्याने महिलांना उघड्यावर जाणे शक्य होत नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने किमान रात्री ११ वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांसह स्वच्छतागृह सुरू ठेवावे, अशी मागणी नागरिकांनी केली (Passenger Convenience)आहे.

ही समस्या स्वतः अनुभवलेल्या सागर दिवटे (माझंपिंपरीचिंचवड, vachk) यांनी प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी केली (Passenger Convenience)आहे.
