पिंपरी, दि. 31 मे : ‘जनगणना २०२७’ अंतर्गत सुरू असलेली घरसूचीकरण व घरगणना प्रक्रिया वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण होण्यासाठी नागरिकांनी प्रगणकांना आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले (Pcmc Census 2027)आहे.
महापालिका क्षेत्रात १६ मेपासून घरसूचीकरण व घरगणना सुरू असून, स्व-गणना केलेल्या नागरिकांच्या माहितीची पडताळणी आणि अंतिम नोंदणीचे काम सुरू आहे. १ ते १५ मेदरम्यान स्व-गणना पूर्ण केलेल्या नागरिकांनी त्यांना प्राप्त झालेला स्व-गणना ओळख क्रमांक (SE ID) प्रगणकांना उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन करण्यात आले (Pcmc Census 2027)आहे.
ज्या नागरिकांनी अद्याप स्व-गणना केलेली नाही, त्यांची माहिती प्रगणकांकडून प्रत्यक्ष भेटीद्वारे नोंदविण्यात येत असून ही प्रक्रिया १४ जूनपर्यंत सुरू राहणार (Pcmc Census 2027)आहे.
जनगणना ही विकास नियोजनाचा महत्त्वाचा आधार असून शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि नागरी सेवांच्या प्रभावी नियोजनासाठी अचूक माहिती आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिकृत प्रगणकांना योग्य व वेळेवर माहिती देऊन ‘जनगणना २०२७’ यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन उपआयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी(Pcmc Census 2027) केले.
