पिंपरी : थेरगाव येथील गणेशनगर परिसरात क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील शिक्षण संकुलात महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमा यांचे औचित्य साधून विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. डॉ. मंगला पानसरे यांनी मार्गदर्शन करताना, “प्रत्येकाच्या योगदानातून राष्ट्र अधिक सक्षम आणि समृद्ध झाले पाहिजे,” असे आवाहन (Mangla Pansare) केले.
प्रा. पानसरे यांनी ‘मानवता, राष्ट्र, व्यक्ती कल्याण नमस्तू!’ या प्रार्थनेने आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता, पाण्याचे महत्त्व, स्वावलंबन, पालकांचा आदर आणि सकारात्मक विचारसरणी यांचे महत्त्व पटवून दिले. प्रार्थना, कृतज्ञता आणि चांगले शब्द यामुळे व्यक्तिमत्त्व घडते, असे सांगत त्यांनी नियमित व्यायाम, पौष्टिक आहार आणि घरगुती खाद्यपदार्थांना प्राधान्य देण्याचा सल्ला दिला. तसेच पालकांनी मुलांना संस्कार देताना आशीर्वादाचे महत्त्व ओळखावे, असेही त्यांनी नमूदMangla Pansare) केले.
यावेळी माजी विद्यार्थी दिनेश जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, चांगले शिक्षण घेऊन आदर्श नागरिक बनण्याचे आवाहन केले. शाळेच्या प्रगतीसाठी भविष्यात आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी (Mangla Pansare) दिली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारतमाता पूजन व ध्वजारोहणाने झाली. राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र गीत आणि संविधानाचे वाचन यामुळे वातावरण देशभक्तीने भारावले. यावेळी बालवाडी ते माध्यमिक विभागातील प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणपत्रक वितरण व बक्षीस देऊन गौरव करण्यात (Mangla Pansare)आला.
कार्यक्रमास प्र. मुख्याध्यापिका सुनीता घोडे, प्र. मुख्याध्यापिका मंजुषा गोडसे, प्रा. खुशाल पानसरे यांची उपस्थिती होती. साक्षी कुरळे यांनी प्रास्ताविक केले, अंजली सुमंत यांनी सूत्रसंचालन केले तर सुनीता घोडे यांनी आभार मानले. शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार (Mangla Pansare)पडला.
