(देहू, 8 नोव्हेंबर )आषाढी वारीची चाहूल लागताच अवघा महाराष्ट्र भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. “ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या अखंड जयघोषात आज (दि. ८) आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, त्यासाठी आळंदी नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले (Ashadhi Wari2026)आहे.
पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी आणि भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. अनेक भाविकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून लहान-मोठ्या वाहनांतून आळंदीत प्रवेश केला आहे. शहरातील शाळा, धर्मशाळा तसेच विविध निवासस्थानी वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, संपूर्ण शहर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले (Ashadhi Wari2026)आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने नदीवरील सर्व पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले असून, नदीपात्राजवळ जाण्यासही प्रशासनाने बंदी घातली आहे. नागरिक आणि भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले (Ashadhi Wari2026)आहे.
बुधवारी सकाळपासून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात दर्शनासाठी वारकऱ्यांची मोठी रांग लागली होती. “ज्ञानोबा माऊली”च्या जयघोषात भाविकांनी समाधीचे दर्शन घेत हरीनामाचा अखंड जप केला. मंदिर परिसर आकर्षक फुलांच्या सजावटीने सजला असून, सर्वत्र भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण अनुभवायला मिळत (Ashadhi Wari2026)आहे.
आता संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि भाविकांचे लक्ष संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याकडे लागले आहे. माऊलींच्या पालखीसमवेत पंढरपूरकडे प्रस्थान करून विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी लाखो वारकरी उत्साहाने सज्ज झाले (Ashadhi Wari2026)आहेत.

