पिंपरी, दि. १ मे २०२६ : “‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ ही ओळ महाराष्ट्राच्या जिद्दी, संघर्षशीलता आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे,” असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६७ वा वर्धापन दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात (Maharashtra Day) आला.
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व नागरिक उपस्थित(Maharashtra Day) होते.
महापौर लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड हे शहर भक्ती, शक्ती आणि श्रम यांच्या संगमातून घडले आहे. संतपरंपरा, चापेकर बंधूंचा क्रांतिकारक वारसा आणि हजारो कामगारांच्या कष्टातून उभी राहिलेली औद्योगिक ओळख ही शहराची खरी ताकद आहे. विकास करताना सामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवणे आणि कामगारांच्या कष्टांचा सन्मान करणे, हाच महाराष्ट्राच्या स्थापनेचा खरा सन्मान ठरेल, असे त्यांनी नमूद (Maharashtra Day) केले.
यावेळी जनगणना २०२७ संदर्भात जनजागृती करण्यासाठी एलईडी व्हॅन मोहिमेचा शुभारंभ महापौर आणि आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आला. या माध्यमातून नागरिकांना स्वयं-नोंदणी प्रक्रियेबाबत माहिती देण्यात येणार असून, मोठ्या संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात (Maharashtra Day) आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी (Maharashtra Day) केले.
