(चिंचवड, प्रतिनिधी ता. २२ ): विविध उद्योगांतील उत्पादने, सेवा आणि प्रक्रियांच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करून ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशाने क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया (QCFI) पुणे शाखेतर्फे गुणवत्ता व्यवस्थापन कन्व्हेन्शन २०२६ चे आयोजन करण्यात आले. भोसरी येथील एक्सलन्स सेंटरमध्ये हा कार्यक्रम उत्साहात पार (QCFI Pune 2026)पडला.
या कन्व्हेन्शनमध्ये ३८ उद्योगसंस्थांतील ४८१ स्पर्धक सहभागी झाले होते. केस स्टडी, स्लोगन आणि पोस्टर या तीन गटांमध्ये एकूण १९५ नामांकनांची नोंद झाली. सहभागी संघांनी गुणवत्ता सुधारणा आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांवर आधारित सादरीकरणे (QCFI Pune 2026)केली.
कार्यक्रमाचे उद्घाटन बॉश चेसिस सिस्टीम्स इंडिया कंपनीचे वरिष्ठ पदाधिकारी जगदीप सिंग बिरदी यांच्या हस्ते झाले. समारोपप्रसंगी एसकेएफ इंडिया इंडस्ट्रियलचे वरिष्ठ अधिकारी प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते विजेत्या संघांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके तसेच स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात(QCFI Pune 2026) आली .
यावेळी क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे, पुणे शाखा परिषद सदस्य माधव बोरवणकर, पवनकुमार रौंदळ, धनंजय वाघोलीकर, परवीन तरफदार आदी उपस्थित(QCFI Pune 2026) होते.
केस स्टडी स्पर्धेचे मूल्यमापन अजय अंबिके, प्रभाकर चोपडे, ऋतू मेहता, धनंजय वाघोलीकर, पंकज बडगुजर, पवन गुजराती, संजय लकडे, चंद्रशेखर बापट, प्रशांत मुधळवाडकर, व्यंकटेश राव, विठ्ठल वाघचौरे, पवनकुमार रौंदळ आणि माधव बोरवणकर यांनी केले. तर स्लोगन व पोस्टर स्पर्धेचे परीक्षण राहुल गुरुळे आणि ललिता परदेशी यांनी(QCFI Pune 2026) केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया रुमाले यांनी केले. रहीम मिर्झा बेग, प्रशांत बोराटे आणि चंद्रशेखर रुमाले यांनी आयोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पार (QCFI Pune 2026) पाडली.
या कन्व्हेन्शनच्या माध्यमातून उद्योगांमध्ये गुणवत्ता व्यवस्थापनाची संस्कृती अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. सहभागी संस्थांनी नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर करत गुणवत्तावृद्धीचा संकल्प व्यक्त (QCFI Pune 2026) केला.


