पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:चिंचवड परिसरात दारू पिण्यास पत्नीने विरोध केल्याच्या रागातून एका व्यक्तीने विषारी औषधाचे सेवन केल्याची घटना घडली असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत (Chinchwad Sucide Case)आहे.
मृत व्यक्तीचे नाव अरविंद लक्ष्मण लोहार असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद यांना दारूचे व्यसन होते. यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचे समोर आले(Chinchwad Sucide Case) आहे.
घटनेच्या दिवशीही दारू पिण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर संतापाच्या भरात अरविंद यांनी घरात ठेवलेले ढेकूण मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने थेरगाव येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू (Chinchwad Sucide Case)झाला.
या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू (Chinchwad Sucide Case)आहे.

