पिंपरी (दिनांक : १० डिसेंबर २०२५) – “पुस्तकी शिक्षणाबरोबरच पिंपरीतील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांतून संशोधन कार्य उत्साहाने आणि सातत्याने पुढे नेले जावे!” अशी अपेक्षा हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी व्यक्त केली. रयत शिक्षण संस्था संचलित महात्मा फुले महाविद्यालय, संभाजीनगर, चिंचवड येथे आयोजित सात दिवसीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषद व चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. साळुंखे यांच्या हस्ते बुधवारी (दि. १० डिसेंबर) संपन्न ( Rayat Shikshan Sanstha)झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले होते. व्यासपीठावर ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सतिश गोरडे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे प्रा. डॉ. मच्छिंद्र गोफणे, सी-मेट संस्थेचे प्रा. डॉ. रामचंद्र कलबर्मे, प्रा. संजय अहिवळे, प्रा. शहाजी मोरे आदी (Rayat Shikshan Sanstha)मान्यवर उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व महात्मा फुले तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून परिषदेचे उद्घाटन करण्यात(Rayat Shikshan Sanstha)आले.
प्रास्ताविक करताना प्रा. दत्तात्रय हिंगणे म्हणाले, “१० ते १८ डिसेंबर या कालावधीत सात दिवस चालणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेत परिसरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक सहभाग नोंदवला आहे.” त्यांनी पुढे माहिती देताना सांगितले की परिषदेत दररोज वेगवेगळ्या विभागांमार्फत विषयानुरूप मार्गदर्शन केले जाणार( Rayat Shikshan Sanstha)आहे.
परिषदेतील प्रमुख विषय पुढीलप्रमाणे –
१० डिसेंबर: रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित व संख्याशास्त्र विभाग – “थिंक ग्रीन, कॅल्क्युलेट क्लीन”
११ डिसेंबर: मराठी, हिंदी, इंग्रजी विभाग – “भाषा व साहित्य विकासात भाषांतराचे योगदान”
१२ डिसेंबर: भूगोल विभाग – “भूगोल आणि शाश्वत पर्यटन”
१३ डिसेंबर: “इमर्जिंग ट्रेण्डस् इन इंटरप्रिनिअरशिप”
१६ डिसेंबर: इतिहास व राज्यशास्त्र विभाग – “भारताचे बदलते परराष्ट्र धोरण : आव्हाने आणि संधी”
१७ डिसेंबर: शारीरिक शिक्षण, क्रीडा, मानसशास्त्र व ग्रंथालय विज्ञान विभाग – “एआय, मानसशास्त्र, ग्रंथशास्त्र व शारीरिक शिक्षण”
१८ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय चर्चासत्र – “बायो फ्युजन २०२५”
प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आयआयटी मद्रासचे प्रा. डॉ. बीराॅह बैरे यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या संयोजनात प्रा. डॉ. सचिन चव्हाण, प्रा. डॉ. नीलकंठ डहाळे, प्रा. डॉ. कामायनी सुर्वे, प्रा. डॉ. अर्चना चव्हाण, प्रा. डॉ. प्रज्ञा भरड, प्रा. गणेश भांगरे, प्रा. विजय वानखेडे, प्रा. पौर्णिमा केंगळे, प्रा. सिमरन मुलाणी व प्रा. काजल धुमाळ यांनी( Rayat Shikshan Sanstha)सहकार्य केले.
प्रा. रीमा बात्रा यांनी नेमकेपणाने सूत्रसंचालन केले तर प्रा. प्रसाद बाठे यांनी आभारप्रदर्शन(Rayat Shikshan Sanstha)केले.



