(विवेक कुलकर्णी )फॉर्म तात्पुरता, क्लास कायमचा!’ वैभव सूर्यवंशीचा झंझावात; १८ चेंडूत विक्रमी अर्धशतक, भारताचा दणदणीत विजय
Form is temporary, class is permanent’ ही क्रिकेटविश्वातील प्रसिद्ध म्हण युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्याच टी-२० सामन्यात अक्षरशः खरी ठरवली. इंग्लंड दौऱ्यात अपेक्षित यश न मिळाल्याने टीकेचा सामना करावा लागलेल्या वैभवने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवत केवळ १८ चेंडूत अर्धशतक झळकावले आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक करणारा खेळाडू बनण्याचा मान (Vaibhav Suryavanshi) पटकावला.
मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने सलग आठव्यांदा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या मयंक यादवने आपल्या पहिल्याच चेंडूवर बळी घेत दमदार सुरुवात करून दिली. त्याला प्रिन्स यादव, रवी बिष्णोई आणि शिवम दुबे यांनी उत्तम साथ दिली. पदार्पण करणारा अशोक कुमारला विकेट मिळाली नसली तरी त्याने टाकलेल्या अचूक आणि किफायतशीर षटकांमुळे झिम्बाब्वेच्या फलंदाजांवर सातत्याने दबाव (Vaibhav Suryavanshi) राहिला.
एकवेळ झिम्बाब्वेचा डाव १०० धावांपूर्वीच आटोपेल असे वाटत असताना शेवटच्या षटकांमध्ये त्यांनी प्रतिकार करत १२५ धावांचा टप्पा पार केला. लक्ष्य फारसे मोठे नसले तरी अलीकडील दोन मालिका गमावलेल्या भारतीय संघासाठी हा पाठलाग तितकासा सोपा मानला जात (Vaibhav Suryavanshi) नव्हता.

भारताच्या डावाची सुरुवात मात्र धक्कादायक झाली. अभिषेक शर्मा आणि ईशान किशन लवकर बाद झाल्याने भारतीय चाहत्यांच्या मनात धाकधूक निर्माण झाली. मात्र त्यानंतर वैभव सूर्यवंशीने मैदानावर अक्षरशः धुमाकूळ घातला. त्याने अवघ्या १८ चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर अर्धशतक पूर्ण करत झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची दाणादाण(Vaibhav Suryavanshi) उडवली.
अर्धशतक पूर्ण केल्यानंतर वैभव बाद झाला, मात्र त्याने विजयाचा मजबूत पाया रचला होता. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि उपकर्णधार तिलक वर्मा यांनी संयमी फलंदाजी करत विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने सात गडी राखून आणि अनेक षटके शिल्लक ठेवत सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी (Vaibhav Suryavanshi) घेतली.
सामन्यात पुनरागमनात प्रभावी गोलंदाजी करणाऱ्या मयंक यादवला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरविण्यात (Vaibhav Suryavanshi)आले.

मालिकेतील उर्वरित दोन सामने पुढील दोन दिवसांत खेळवले जाणार असून भारताने मालिका ३-० अशी जिंकावी, अशी अपेक्षा भारतीय क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत. श्रेयस अय्यर, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांसारख्या अनुभवी फलंदाजांना धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला, पण युवा वैभव सूर्यवंशीने आपल्या निर्भीड आणि आक्रमक फलंदाजीने भविष्यातील मोठा तारा असल्याची जोरदार झलक दाखवून (Vaibhav Suryavanshi) दिली.





