*पिंपरी, दि. १७ एप्रिल २०२६(प्रतिनिधी )— “१८५७ पासून पुढील ७५ वर्षांत अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानाने भारतभूमी पवित्र झाली. त्यातील तीन क्रांतिफुले म्हणजे चापेकर बंधू होत,” असे प्रतिपादन डॉ. नीता मोहिते यांनी (Three Revolutionary Flowers) केले* .
क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या १८ एप्रिल स्मृतिदिनानिमित्त क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने आयोजित ‘चापेकर व्याख्यानमाला’ मालिकेतील ‘क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या शौर्याचे स्मरण’ या विषयावरील पहिले व्याख्यान निगडी प्राधिकरण येथील कॅप्टन कदम सभागृहात पार पडले. यावेळी त्या बोलत (Three Revolutionary Flowers) होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शास्त्रज्ञ व समितीचे उपाध्यक्ष डॉ. अशोक नगरकर होते. व्यासपीठावर उपमहापौर शर्मिला बाबर, डॉ. शकुंतला बन्सल, शाहीर आसराम कसबे, सामाजिक कार्यकर्ते नाना कांबळे आदी मान्यवर उपस्थित (Three Revolutionary Flowers) होते.
डॉ. मोहिते यांनी १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यापासून ते चापेकर बंधूंना ब्रिटिशांनी दिलेल्या फाशीपर्यंतचा इतिहास सविस्तर उलगडून सांगितला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्यांनी गुप्तपणे आखलेल्या योजनांचा आणि धाडसी कारवायांचा उल्लेख करत, पुण्यात शस्त्रे मिळविणे, मुंबईतील राणी व्हिक्टोरियाच्या पुतळ्यास डांबर फासणे, प्लेगच्या साथीत सक्तीच्या परीक्षेविरोधात परीक्षा मंडप पेटवून देणे अशा अनेक घटनांचा त्यांनी आढावा (Three Revolutionary Flowers) घेतला.
चापेकर बंधूंचे देशप्रेम, अचूक नियोजन आणि राष्ट्रासाठी केलेले बलिदान तरुण पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त (Three Revolutionary Flowers)केली.
उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या, “पिंपरी-चिंचवडची भूमी चापेकर बंधूंच्या बलिदानाने ऐतिहासिक ठरली आहे. हा प्रेरणादायी इतिहास व्याख्यानमालेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचला (Three Revolutionary Flowers)पाहिजे.”
अध्यक्षीय मनोगतात डॉ. अशोक नगरकर यांनी, “क्रांतिकारकांच्या सशस्त्र लढ्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले. आज देश संरक्षण क्षेत्रात प्रगती करत असला, तरी दहशतवादाचे समूळ उच्चाटन हे जगासमोरील मोठे आव्हान आहे,” असे मत व्यक्त (Three Revolutionary Flowers)केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनीता घोडे यांनी केले. शुभदा कानडे, योगेश्वरी महाजन आणि प्रज्ञा फुलपगार यांच्या चापेकर स्तवनाने कार्यक्रमाचा समारोप(Three Revolutionary Flowers) झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे व्यवस्थापक अतुल आडे, समर्थ डोंगरे, सागर शेवाळे, किरण गायकवाड यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन स्मिता जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन आसराम कसबे यांनी (Three Revolutionary Flowers)केले.
