(पिंपरी, दि. १६ जुलै २०२६) : मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ नागरिकांच्या वारसांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महापौर रवि लांडगे यांच्या निर्देशानुसार मदत वितरणाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली असून, मृत अक्षय सावंत (वय ३२) यांच्या कुटुंबीयांच्या खात्यात १० लाख रुपयांची मदत जमा करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी (Garbage Depot Accident)दिली.
अक्षय सावंत यांच्या वारसांपैकी पत्नी हर्षदा सावंत यांच्या खात्यात ३४ टक्के, तर आई रेश्मा सावंत आणि वडील राजू सावंत यांच्या खात्यात प्रत्येकी ३३ टक्के रक्कम जमा करण्यात आली(Garbage Depot Accident) आहे.
दरम्यान, दुर्घटनेतील इतर मृतांमध्ये भावेश वाणी (वय ३३), सुनील कोरके (वय ४०, आळंदी), सन्नी माने (वय ३९, गंधर्वनगरी, मोशी), महेश कुंभार (वय ३३, छत्रपती संभाजीनगर), नागेश गायकवाड (वय २६, संजय गांधी नगर, मोशी), रणजीत पाटील (वय २२, मोशी), राहुल गायकवाड (वय २३, मोशी) आणि वामन कसबे (वय ५०, मोशी) यांच्या वारसांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता जलद गतीने सुरू आहे. प्रक्रिया पूर्ण होताच त्यांच्या खात्यातही आर्थिक मदतीची रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट (Garbage Depot Accident)केले.
कोट
“मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होताच संबंधितांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा केली जात आहे. या कठीण प्रसंगी बाधित कुटुंबांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. तसेच शहरातील सर्व वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पांच्या सुरक्षा व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणा तातडीने राबविण्यात येत (Garbage Depot Accident)आहेत.”
— रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

