प्रतिनिधी :देशभरातील औषध विक्रेत्यांनी ऑनलाइन औषध विक्रीविरोधात आज देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात राज्यासह देशभरातील लाखो मेडिकल व्यावसायिक सहभागी झाले असून अनेक शहरांमध्ये मेडिकल दुकाने बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात (Chemist Strike) आहे.
All India Chemists and Druggists Association यांच्या नेतृत्वाखाली हा बंद आयोजित करण्यात आला आहे. संघटनेच्या माहितीनुसार, देशभरातील सुमारे १२.५ लाख औषध विक्रेते आणि वितरक या आंदोलनात सहभागी होत आहेत. महाराष्ट्रातील अंदाजे १.२५ लाख मेडिकल दुकानेही आज बंद राहू (Chemist Strike)शकतात.
रुग्णांना अडचणींची शक्यता
या बंदमुळे नियमित औषधांवर अवलंबून असलेल्या रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त रुग्ण तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये चिंता वाढली(Chemist Strike) आहे.
अनेक शहरांमध्ये नागरिकांनी आवश्यक औषधांचा साठा करण्यासाठी कालपासूनच मेडिकल दुकानांमध्ये गर्दी केल्याचे चित्र दिसून (Chemist Strike)आले.
ऑनलाइन औषध विक्रीवर नियंत्रणाची मागणी
औषध विक्रेत्यांच्या संघटनांनी केंद्र सरकारकडे ऑनलाइन औषध विक्रीवर तातडीने कठोर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर नियमबाह्य पद्धतीने औषधांची विक्री होत असल्याचा आरोप संघटनांनी केला (Chemist Strike)आहे .
संघटनांच्या मते, अनेक वेबसाइट्स आणि मोबाईल अॅप्स डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे विकत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असून विद्यमान कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचा दावा करण्यात आला(Chemist Strike) आहे.
कोविड काळातील सवलतींचा गैरवापर?
औषध विक्रेत्यांनी असा आरोप केला आहे की, कोरोना महामारीदरम्यान केंद्र सरकारने ऑनलाइन औषध विक्रीसाठी काही तात्पुरत्या सवलती दिल्या होत्या. मात्र काही कंपन्या अजूनही त्या सवलतींचा गैरफायदा घेत असल्याचे संघटनांचे म्हणणे(Chemist Strike) आहे.
सरकारकडे अनेक वेळा निवेदने देऊनही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोपही करण्यात आला (Chemist Strike)आहे.
औषध विक्रेत्यांचे प्रमुख आक्षेप
संघटनांनी ऑनलाइन औषध विक्रीबाबत काही गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत —
अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडून औषध विक्रीची योग्य डिजिटल नोंद ठेवली जात नसल्याचा(Chemist Strike) आरोप
नशेच्या गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या आणि शक्तीवर्धक औषधे सहज उपलब्ध होत असल्याची(Chemist Strike) चिंता
ऑनलाइन प्रिस्क्रिप्शन देणारे डॉक्टर खरे की बनावट, याची पडताळणी कठीण
बनावट औषधांच्या विक्रीचे जाळे सक्रिय असल्याचा संशय
विद्यमान ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स कायद्यात ऑनलाइन औषध विक्रीबाबत स्पष्ट नियम नसल्याचा(Chemist Strike) मुद्दा
दरम्यान, औषध विक्रेत्यांनी हा बंद शंभर टक्के यशस्वी होईल असा दावा केला आहे. ऑनलाइन औषध विक्रीसंदर्भात स्पष्ट आणि कठोर धोरण जाहीर करण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे केली (Chemist Strike)आहे .
या बंददरम्यान आपत्कालीन औषध सेवांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली (Chemist Strike)नाही.
