(पिंपरी, प्रतिनिधी दि. २२ जून) : पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) नागपूरच्या विस्तारित उपशाखेसाठी मोशी येथील शासकीय जागा निशुल्क उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे शहरात राष्ट्रीय स्तरावरील व्यवस्थापन शिक्षण संस्थेच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला (IIM Extension Moshi) आहे.
या प्रकल्पासाठी आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. यापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महसूल विभागानेही या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला (IIM Extension Moshi)होता.
पुणे, मुंबई आणि पिंपरी-चिंचवडला जोडणारी उत्तम संपर्क व्यवस्था, औद्योगिक पट्टा आणि आयटी क्षेत्राची वाढ लक्षात घेऊन मोशीची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे उच्च शिक्षण, उद्योग आणि कौशल्य विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे मानले जात (IIM Extension Moshi) आहे .
याबाबत आमदार महेश लांडगे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडला देशातील अग्रगण्य ‘एज्युकेशन हब’ बनवण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकारात्मक पाठबळामुळे आयआयएम उपशाखेच्या उभारणीला गती मिळाली असून, हा प्रकल्प शहराच्या शैक्षणिक आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा(IIM Extension Moshi) देईल.”
