प्रतिनिधी :श्री मयुरेश्वर अवतार श्रीमंत महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांच्या ४६४ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन यंदा ६ ते १० डिसेंबर २०२५ दरम्यान संजीवन समाधी मंदिर आणि श्री मंगलमूर्ती वाडा, चिंचवड येथे भव्य उत्साहात करण्यात आले आहे. यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘इथेनॉल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांना ‘श्री मोरया गोसावी महाराज जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, योगिता गोडबोले, संदीप उबाळे आणि पं. भुवनेश कुमार कोमकली यांच्या गायनाची पर्वणी रसिकांना अनुभवता येणार आहे. संकर्षण आणि स्पृहा यांच्या विशेष कार्यक्रमांसह योगेश सोमण यांचा ‘आनंदडोह’ हा बहुप्रतीक्षित सांस्कृतिक कार्यक्रमही यंदा विशेष (Morya Gosavi Mahotsav)आकर्षण ठरणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम
Yashwant Venu Award:यशवंतराव यांचे राजकारण समन्वयवादी! – डॉ. श्रीपाल सबनीस
प्रतिनिधी:यशवंतराव चव्हाण यांची राजकीय वाटचाल समन्वयवादी होती, त्यामुळे आजच्या पिढीतील नेत्यांनी ‘यशवंतनीती’ आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. ऑटोक्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, चिंचवड येथे गुरुवार, २७ नोव्हेंबर रोजी आयोजित ‘यशवंत – वेणू सन्मान’ प्रदान(Yashwant Venu Award) सोहळ्यात ते बोलत होते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड विभागातर्फे लातूरचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पाटील कव्हेकर यांना यशवंत – वेणू सन्मान प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर होते. पद्मश्री गिरीश प्रभुणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार आणि नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांच्या उपस्थितीने(Yashwant Venu Award) व्यासपीठ उजळून निघाले.
याप्रसंगी रुद्रवीर टेक्नो इंडस्ट्रीजचे संचालक विशाल पलांडे (यशवंतराव चव्हाण युवा उद्योजक पुरस्कार) आणि ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे (यशवंतराव चव्हाण सह्याद्री भला माणूस पुरस्कार) यांनाही गौरविण्यात(Yashwant Venu Award )आले.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “यशवंतराव आणि वेणूताईंचे दाम्पत्यजीवन परस्परांवरील निखळ समर्पणाचे उदाहरण होते. यशवंतरावांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला वेणूताईंनी शांत, सुगंधी सहचारिणीप्रमाणे साथ दिली. कव्हेकर दांपत्याचे सामाजिक योगदान व्यापक असून त्यांच्या कार्यात यशवंत–वेणू जोडीचे प्रतिबिंब दिसते; त्यामुळेच ते या सन्मानास (Yashwant Venu Award) पात्र आहेत.”
पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी, “यशवंतरावांनी विकासाची धार बहुजनांपर्यंत पोहोचवली,” असे मत व्यक्त केले. तर सुनीताराजे पवार म्हणाल्या, “देश कृषिप्रधान असूनही शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे. यशवंतरावांनी सांस्कृतिक जीवनातही महत्त्वपूर्ण योगदान दिले. वेणूताई त्यांच्या मागे एक शांत ज्योत(Yashwant Venu Award) बनून उभ्या राहिल्या.”
सन्मान स्वीकारताना शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले, “यशवंतराव हे खऱ्या अर्थाने अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. वेणूताई त्यांच्यासाठी सावलीप्रमाणे कायम साथ करणाऱ्या होत्या. महाराष्ट्र हा फक्त मराठ्यांचा नाही तर संपूर्ण मराठी जनतेचा आहे, ही यशवंतरावांची ठाम भूमिका होती. २०४० पर्यंत भारत महासत्ता बनेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त (Yashwant Venu Award)केला.
प्रतिभा पाटील कव्हेकर म्हणाल्या, “हा गौरव हा आमच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे,” असे सांगून त्यांनी सामाजिक कार्याचा आढावा दिला. विशाल पलांडे यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करण्याचा प्रवास सांगितला, तर नंदकुमार मुरडे यांनी कृतज्ञता व्यक्त (Yashwant Venu Award)केली.
कार्यक्रमाची सुरुवात वृक्षपूजन आणि नितीन देशमुख लिखित ‘यशवंतराव’ कवितेचे राजेंद्र वाघ यांनी केलेल्या गायनाने झाली. प्रास्ताविक पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले. सुदाम भोरे यांनी स्वागत केले. श्रमश्री बाजीराव सातपुते यांनी ‘यशवंतराव इतिहासाचे सुवर्णपान’ या विषयावर व्याख्यान दिले. मानपत्राचे वाचन मानसी चिटणीस यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात डॉ. पंडित विद्यासागर यांनी, “केंद्र सरकारमध्ये चार महत्त्वाची खाती सांभाळणारे यशवंतराव हे महाराष्ट्रातील एकमेव नेते होते,” असे (Yashwant Venu Award) सांगितले.
कार्यक्रमाच्या संयोजनात अरुण गराडे, इंद्रजित पाटोळे, प्रतिमा काळे, जयवंत भोसले, प्रा. प्रभाकर दाभाडे, राजू जाधव आणि प्रदीप गांधीलीकर यांनी सहकार्य केले. सुत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले यांनी केले, तर आभारप्रदर्शन संगीता झिंजुरके (Yashwant Venu Award)यांनी केले.
Constitution Day PCMC:पिंपरी चिंचवड : संविधान दिन व महात्मा फुले स्मृतीदिनानिमित्त तीन दिवसीय कार्यक्रम
पिंपरी | संविधान दिन तसेच क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने २६ ते २८ नोव्हेंबरदरम्यान तीन दिवसीय प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भिमसृष्टी, पिंपरी येथील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ हे सर्व कार्यक्रम पार(Constitution Day PCMC ) पडणार आहेत.
२६ नोव्हेंबर – प्रबोधनात्मक गीत गायन
कार्यक्रमाची सुरुवात बुधवार, दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर, मुंबई यांच्या प्रबोधनात्मक गीतांच्या कार्यक्रमाने होणार(Constitution Day PCMC ) आहे.
या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत – अशोक गायकवाड आणि स्वप्नील पवार.
2७ नोव्हेंबर – विविध प्रबोधनपर कार्यक्रमांची मालिका
१) दुपारी ३.३० वाजता – प्रबोधनात्मक कार्यक्रम
सादरकर्ते : संतोष जोंधळे आणि सहकारी
२) सायं. ५.०० वाजता – प्रबोधनपर कार्यक्रम : जागर संविधानाचा
सादरकर्ते : चंद्रकांत शिंदे, रेश्मा सोनवणे, राधा खुडे, अजय क्षीरसागर व सहकारी
३) सायं. ७.०० वाजता – क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिन गीत(Constitution Day PCMC ) कार्यक्रम
सादरकर्ते : राहुल शिंदे
४) सायं. ७.३० वाजता – जागर क्रांतिसूर्याचा : प्रबोधनपर कार्यक्रम
सादरकर्ते : शिरीष पवार व सहकारी
२८ नोव्हेंबर – महात्मा फुले यांच्या कार्याचा जागर
सायं. ४.३० वाजता – महात्मा फुले स्मृतिदिन व्याख्यान
व्याख्यानाचा विषय
“महात्मा फुले यांचे शैक्षणिक धोरण आणि सामाजिक क्रांती”
व्याख्याते
डॉ. सुखदेव थोरात – ज्येष्ठ अर्थतज्ञ व माजी अध्यक्ष(Constitution Day PCMC ), विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), भारत सरकार
सर्व कार्यक्रमांचे (Constitution Day PCMC )ठिकाण :
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ (भिमसृष्टी), पिंपरी, पुणे – १८.
या तीन दिवसीय कार्यक्रमांद्वारे महापालिका संविधान, सामाजिक जागरूकता, शैक्षणिक विचार आणि सामाजिक परिवर्तनातील महात्मा फुले यांच्या योगदानाची जनजागृती करत आहे. प्रबोधनात्मक गीत, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना प्रेरणा देण्याचे उद्दिष्ट यामागे (Constitution Day PCMC ) आहे.
YCM Sammelan:४१ वा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह अंबाजोगाई येथे उत्साहात; तीन दिवसीय वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल
अंबाजोगाई :यशवंतराव चव्हाण स्मृती समितीतर्फे आयोजित करण्यात येणारा ४१ वा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह यंदा २५, २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयात भव्यदिव्य कार्यक्रमांसह पार पडणार आहे. साहित्य, कला, संगीत, कृषी, बालरंजन, कवी संमेलने आणि पुरस्कार सोहळ्याने समृद्ध असा तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव साजरा होणार असल्याची माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी (YCM Sammelan) दिली.
उद्घाटन व कवी संमेलन – २५ नोव्हेंबर
मंगळवारी सायं. ५.३० वाजता या समारोहाचे उद्घाटन नांदेडचे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते(YCM Sammelan )होणार आहे.
रात्री ८.३० वाजता कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. पी. विठ्ठल (नांदेड) असतील.
कवी अविनाश भारती सूत्रसंचालन करणार असून शरद धनगर, पुनीत मातकर, अनंत राऊत, डी. के. शेख, लता ऐवळे कदम, अविनाश काठवटे, गुंजन पाटील, गजानन मते, सुनील उन्हाळे, सय्यद चांद तरोडकर आणि आत्माराम जाधव यांचा सहभाग राहणार आहे.
चित्रकला स्पर्धा, बालआनंद मेळावा आणि ‘सोबतीचा करार’ – २६ नोव्हेंबर
बुधवारी सकाळी ८ वाजता ८ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा होणार आहे.
सकाळी १०.३० वाजता बाल आनंद मेळावा पार पडेल. विजेत्यांना साहित्यिक विठ्ठल जाधव यांच्या उपस्थितीत बक्षिसे प्रदान केली जातील. चित्रकार त्र्यंबक पोखरकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
सायंकाळी ८ वाजता कवी वैभव जोशी यांच्या रचनांवर आधारित “सोबतीचा करार” या संगीत मैफिलीचे आयोजन आहे.
गायक दत्तप्रसाद रानडे यांना संगीतकार आशिष मुजुमदार, निनाद सोलापूरकर, समीर शिवगार आणि आमोद कुलकर्णी यांची साथसंगत लाभणार आहे.
शेतकरी परिषद आणि समारोप – २७ नोव्हेंबर
गुरुवारी सकाळी १०.३० वाजता शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले असून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण “यशवंतराव चव्हाण यांचे कृषी–औद्योगिक धोरण आणि वर्तमान शेती” या विषयावर मार्गदर्शन करतील.
अध्यक्षस्थानी प्रयोगशील महिला शेतकरी विजया गंगाधर घुले उपस्थित राहणार आहेत.
सायं. ५.३० वाजता समारोप व यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार वितरण सोहळा डॉ. कमलताई गवई यांच्या हस्ते पार पडणार आहे.
स्मृती पुरस्कार विजेते
कृषी – विजया घुले (केळसांगवी)
साहित्य – केशव वसेकर (परभणी)
संगीत – पं. मुकेश जाधव (पुणे)
क्रीडा – युवा गौरव – कु. प्रियंका इंगळे (भारतीय महिला खो-खो संघ कर्णधार)
पुरस्कारात शाल, स्मृतिचिन्ह, पुष्पहार आणि रु. ५०००/- रोख रक्कम असे स्वरूप असेल.
समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक भगवानराव शिंदे (बप्पा) यांचा विशेष सन्मानही करण्यात येणार आहे.
शास्त्रीय संगीत मैफल
रात्री ८.३० वाजता जागतिक ख्यातीचे तबलावादक पं. मुकेश जाधव यांचे तबला सोलो वादन होईल. त्यांना संवादिनीवर अभिषेक शिनकर साथ करतील.
यानंतर आंतरराष्ट्रीय गायक कृष्णा बोंगाणे यांची मैफल रंगणार असून त्यांना तबल्यावर आशय कुलकर्णी आणि संवादिनीवर अभिषेक शिनकर साथ करतील.
ग्रंथ प्रदर्शन व कला दालने
तिन्ही दिवस ग्रंथ विक्री-प्रदर्शन, चित्रकला व हस्तकला दालने भरवली जाणार आहेत.
समितीतर्फे सर्व नागरिक, विद्यार्थी आणि रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले(YCM Sammelan )आहे.
