(आकुर्डी, सुरेश कंक दि. ९ जुलै) : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पिंपरी-चिंचवड शहरातील साहित्यिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भक्तिमय वातावरणात दिंडी काढली. गेल्या सहा वर्षांपासून “पिंपरी-चिंचवडकर साहित्यिकांची दिंडी” आध्यात्मिक आणि सामाजिक संदेश देत पालखी सोहळ्यात सहभागी होत (Ashadhi Wari 2026) आहे.
यंदाही साहित्यिकांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा जागर करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…” या संतवचनाचा आधार घेत “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश फलकांच्या माध्यमातून देण्यात आला. तसेच “विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ” या अभंगातील विचारही जनतेपर्यंत पोहोचविण्यात (Ashadhi Wari 2026)आले.
पारंपरिक वेशभूषेत, हाती टाळ घेऊन साहित्यिकांनी अभंग, गवळणी आणि हरिनामाचा गजर करत दिंडीत सहभाग घेतला. त्यांच्या भक्तिमय सादरीकरणाने मार्गावरील भाविकांचे विशेष लक्ष वेधून (Ashadhi Wari 2026)घेतले.
यावेळी संत तुकाराम महाराजांच्या वेशभूषेत सहभागी झालेले ह.भ.प. प्रकाश घोरपडे हे आकर्षणाचे केंद्र ठरले. फेर धरत, फुगड्या खेळत आणि रामकृष्ण हरीच्या अखंड नामस्मरणात साहित्यिकांनी वारीचा आनंद (Ashadhi Wari 2026)अनुभवला.
दिंडीच्या विसाव्याच्या ठिकाणी हेमंत जोशी, तानाजी एकोंडे, कैलास भैरट, सुभाष चटणे, संजय गमे, शामराव सरकाळे, सुरेश कंक, मल्लिकार्जुन इंगळे आणि सुरेंद्र विसपुते यांनी अभंग, गवळणी आणि कविता सादर केल्या. या आध्यात्मिक कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन सुहास घुमरे यांनी (Ashadhi Wari 2026)केले.
दिंडीच्या आयोजनात ह.भ.प. अशोक महाराज गोरे, मुरलीधर दळवी, दत्ता कांगळे, शिवाजीराव शिर्के, शरद काणेकर, संपत शिंदे, हनुमंत भोसले, सुभाष चव्हाण, मुकुंद जोशी, बाळासाहेब कुंभार, अभय जोशी आणि अनंत पाठक यांनी मोलाची भूमिका(Ashadhi Wari 2026) बजावली.
आकुर्डी येथील तुळजाभवानी मंदिराजवळ दिंडीची भक्तिमय वातावरणात सांगता(Ashadhi Wari 2026) झाली.

