पिंपरी : यूपीएससी परीक्षेत १२५ वी रँक मिळवत आयएफएससाठी निवड झालेल्या कबीर राहुल कांबळे यांचा पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारांकडून भव्य सत्कार करण्यात आला. महानगरपालिका इमारतीतील पत्रकार कक्षात आयोजित कार्यक्रमात त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची प्रत, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्यांच्या आई-वडिलांचाही सन्मान करण्यात (Kabir Kamble UPSC)आला.
कबीर कांबळे यांच्या यशामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, ते शहरातील युवकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन (Kabir Kamble UPSC) केले.
कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे, बाळासाहेब ढसाळ, संतलाल यादव, बाबू कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ समाजसेवक मारुती भापकर आणि युवराज दाखले यांनीही कबीर यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा(Kabir Kamble UPSC) दिल्या.
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार संतलाल यादव यांनी कबीर कांबळे यांच्या यशाचे कौतुक करत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर माहिती उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच उपस्थित मान्यवरांनी कबीर यांनी समाजातील गरीब, शोषित आणि वंचित घटकांसाठी न्यायाने काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त(Kabir Kamble UPSC) केली.
दरम्यान, माजी पालिका अधिकारी शांताराम भोंडवे यांचे सुपुत्र संकेत भोंडवे (आयएएस) तसेच काळेवाडीचे माजी नगरसेवक सुरेश नाढे पाटील यांचे सुपुत्र विक्रम नाढे (आयएफएस) यांनीही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून शहराचा गौरव वाढविल्याचा उल्लेख यावेळी करण्यात (Kabir Kamble UPSC) आला.
कबीर कांबळे यांनी आपल्या यशामागील प्रवास सांगताना सांगितले की, दहावीत असताना तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या कार्यशैलीतून त्यांना यूपीएससीची प्रेरणा मिळाली. पहिल्या प्रयत्नात अपयश आले, मात्र त्यांनी हार न मानता दुसऱ्या प्रयत्नात यश (Kabir Kamble UPSC) मिळवले.
“मी कोणतीही खासगी शिकवणी न लावता दररोज सुमारे ११ तास अभ्यास केला. प्रा. लक्ष्मीकांत यांच्यासह विविध लेखकांची पुस्तके वाचली. ‘द हिंदू’ या वृत्तपत्रातील संपादकीय लेख नियमित वाचत होतो,” असे कबीर यांनी (Kabir Kamble UPSC) सांगितले.
मुलाखतीतील अनुभव सांगताना त्यांनी वन विभागाशी संबंधित प्रश्नांचा उल्लेख केला. “जंगलात आग लागल्यास प्रथम कोणती उपाययोजना कराल?” असा प्रश्न विचारण्यात आल्याचे त्यांनी (Kabir Kamble UPSC) सांगितले.
देशातील विकासकामांमुळे मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत कबीर म्हणाले, “विकासासोबत पर्यावरण संवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे. तोडल्या जाणाऱ्या झाडांच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड होणे आवश्यक आहे. पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणासाठी काम करण्याची माझी तीव्र इच्छा आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांचा उपयोग करून मी पर्यावरण संवर्धनासाठी कार्य (Kabir Kamble UPSC) करेन.”
