पिंपरी-चिंचवड : शहरात गेल्या काही महिन्यांपासून चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने फिल्मी स्टाईल सापळा रचून सराईत चेन स्नॅचरला अटक केली. आरोपीकडून सुमारे 76 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत सुमारे 15 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी (Chain Snatcher Arrested ) दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुमित इंगले (रा. सोलापूर) असे आहे. याबाबतची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त सारंग आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत(Chain Snatcher Arrested ) दिली.
सांगवी परिसरातील चेन स्नॅचिंगच्या ताज्या घटनेनंतर तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी 150 ते 200 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यातून आरोपी प्रत्येक गुन्ह्यानंतर बाणेरच्या दिशेने पळ काढत असल्याचे निष्पन्न (Chain Snatcher Arrested ) झाले.
यानंतर पोलिसांनी संबंधित परिसरात गुप्त पाळत ठेवून सापळा रचला. संशयित दिसताच त्याचा पाठलाग करण्यात आला. एका बंद रस्त्यावर पोहोचताच आधीपासून दबा धरून बसलेल्या पोलिसांनी चारही बाजूंनी घेराव घालत त्याला ताब्यात (Chain Snatcher Arrested ) घेतले.
या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये वेषांतर केलेले पोलिस कर्मचारी आरोपीला पकडताना दिसत आहेत. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पथकाचा सन्मान करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सारंग आव्हाड यांनी (Chain Snatcher Arrested ) सांगितले.
