(प्रतिनिधी ):मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात ८ जुलै रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रकल्पाची प्रमुख कंत्राटदार कंपनी अँटोनी लारा रिनेव्हेबल एनर्जी प्रा. लि. यांना कारणे दाखवा नोटीस बजावली (Antony Lara Fired) आहे.
नोटिशीत नमूद करण्यात आले आहे की, कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा मोठा भाग खचून पडल्याने एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात सुरक्षा नियम, करारातील अटी, घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ तसेच केंद्रीय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात गंभीर त्रुटी झाल्याचे आढळून आले (Antony Lara Fired )आहे.
याशिवाय कचऱ्याच्या ढिगाऱ्याची उंची नियंत्रणात ठेवणे, उताराची स्थिरता (Slope Stability), जोखीम विश्लेषण, पर्जन्यजल व्यवस्थापन, नियमित निरीक्षण आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये हलगर्जीपणा झाल्याचाही ठपका कंपनीवर ठेवण्यात आला आहे. यापूर्वी अशा धोकादायक परिस्थितीबाबत कोणत्याही सूचना मिळाल्या होत्या का, याबाबतही महापालिकेने खुलासा मागविला (Antony Lara Fired )आहे.
महापालिकेने कंपनीला या प्रकरणी सविस्तर व मुद्देसूद स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले असून, समाधानकारक उत्तर न मिळाल्यास बँक गॅरंटी जप्त करणे, भारतीय न्याय संहितेनुसार फौजदारी गुन्हा दाखल करणे तसेच अन्य कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटिशीत देण्यात आला (Antony Lara Fired )आहे.
