(विवेक कुलकर्णी): पिंपरी-चिंचवड परिसरात सोशल मीडियासाठी धोकादायक स्टंट करण्याच्या प्रकारांना ऊत आला असून, असाच एक गंभीर प्रकार वाकडमध्ये समोर आला आहे. एका तरुणाने केवळ ‘रील’ बनवण्यासाठी वर्दळीच्या रस्त्यावर आणि फूटपाथवर थार गाडी चालवत बेफाम ड्रायव्हिंग केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला (Reel Stunt Video)आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने हा संपूर्ण प्रकार मुद्दाम शूट करून स्वतःच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होत (Reel Stunt Video) होता.
या घटनेची गंभीर दखल घेत वाकड पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संबंधित तरुणाचा शोध घेण्यात आला. त्याच्यासह त्याच्या मित्रालाही पोलिसांनी ताब्यात (Reel Stunt Video)घेतले.
पोलीस ठाण्यात आणल्यानंतर ‘रील स्टार’ बनण्याचा नाद उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. पोलिसांनी समज दिल्यानंतर संबंधित तरुणाने हात जोडून माफी मागितली. तसेच, यापुढे असे कृत्य न करण्याचे आश्वासनही त्याने(Reel Stunt Video) दिले.
दरम्यान, “लाईक्स आणि व्ह्यूजच्या नादात स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका. अशा प्रकारांना कुठलीही सहानुभूती दाखवली जाणार नाही, कायदेशीर कारवाई अटळ आहे,” असा स्पष्ट इशारा पोलिसांकडून देण्यात आला(Reel Stunt Video) आहे.
सध्या या घटनेमुळे ‘रील्स’साठी धोकादायक स्टंट करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. नागरिकांनीही अशा प्रकारांना प्रोत्साहन न देता जबाबदारीने वागण्याचे आवाहन करण्यात येत (Reel Stunt Video)आहे.
