पिंपरी, दि. १५ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समिती तसेच विशेष सभांचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) बंद करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती नगरसेवक संदीप वाघेरे यांनी (PCMC Live Streaming)दिली.
यासंदर्भात सोमवारी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. असीम सरोदे आणि नगरसेवक संदीप वाघेरे यांनी भूमिका स्पष्ट (PCMC Live Streaming) केली.
नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने पाठविण्यात आलेल्या नोटिशीत महापालिकेच्या महत्त्वाच्या बैठका नागरिकांसाठी ऑनलाइन थेट प्रसारित करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या कामकाजाची माहिती नागरिकांना मिळणे हा त्यांचा मूलभूत लोकशाही अधिकार असल्याचा मुद्दा या नोटिशीत मांडण्यात आला असल्याचे ॲड. असीम सरोदे यांनी (PCMC Live Streaming)सांगितले.
नोटिशीत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९, माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ४ तसेच डिजिटल प्रशासन आणि पारदर्शकतेसंदर्भातील राज्य शासनाच्या धोरणांचा संदर्भ देण्यात आला आहे. महापालिकेच्या सभा पुन्हा थेट प्रसारित करण्याबरोबरच यापूर्वी झालेल्या सभांचे व्हिडीओ संग्रहित करून ते नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली (PCMC Live Streaming)आहे.
महापालिका प्रशासनाला या नोटिशीद्वारे १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत सकारात्मक निर्णय न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक संदीप वाघेरे यांनी (PCMC Live Streaming) दिला.
महापालिकेच्या सभांचे थेट प्रक्षेपण बंद झाल्यामुळे नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांकडून नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर बजावण्यात आलेल्या कायदेशीर नोटिशीमुळे प्रशासनावरील दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात (PCMC Live Streaming) आहे.
या नोटिशीवर ॲड. असीम सरोदे, ॲड. श्रिया आवळे, ॲड. तृप्ती गायकवाड आणि ॲड. आर्या राजे भोसले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने ही कायदेशीर कार्यवाही करण्यात आली (PCMC Live Streaming)आहे.
