पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी कचरा डेपो येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर प्रशासकीय स्तरावर कारवाईची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बजावलेल्या ‘कारण दाखवा’ नोटीसनुसार संबंधित ठेकेदार कंपनी आणि जबाबदार अधिकाऱ्यांनी मंगळवार (दि. १४ जुलै) रोजी सायंकाळी आपले सविस्तर लेखी खुलासे आयुक्त कार्यालयात सादर (Kachra Depo Accident) केले.
मोशी कचरा डेपो येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे संचालन करणाऱ्या अँटोनी लारा रिन्यूएबल या कंपनीसह महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी (दि. १३ जुलै) कारण दाखवा नोटीस बजावली होती. दुर्घटनेस कारणीभूत ठरलेल्या संभाव्य निष्काळजीपणाबाबत आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत मंगळवारपर्यंत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश या नोटिशीत देण्यात आले (Kachra Depo Accident)होते.
आयुक्तांनी घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर संबंधित यंत्रणांमध्ये मोठी हालचाल सुरू झाली होती. अखेर निर्धारित मुदतीत अँटोनी लारा रिन्यूएबल कंपनी, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांनी स्वतंत्रपणे आपले लेखी खुलासे सादर केले (Kachra Depo Accident) आहेत.
या खुलाशांमध्ये दुर्घटनेची कारणमीमांसा, सुरक्षा उपाययोजना, प्रकल्पाच्या कार्यपद्धतीबाबतची भूमिका तसेच जबाबदारीसंदर्भातील मांडणी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र, संबंधितांनी नेमका कोणता बचाव केला आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली (Kachra Depo Accident) नाही.
मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेनंतर कचरा प्रक्रिया प्रकल्पातील सुरक्षा व्यवस्थेसह महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या देखरेखीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता प्राप्त झालेल्या खुलाशांचा सखोल अभ्यास करून आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी संबंधित अधिकारी आणि ठेकेदार कंपनीविरोधात कोणती प्रशासकीय अथवा कायदेशीर कारवाई करतात, याकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले (Kachra Depo Accident) आहे.
