(प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या धरण ९२.५५ टक्के भरले असून, धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोणत्याही क्षणी पवना नदीपात्रात कमी-अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली (Pawana Dam Water)आहे.
या पार्श्वभूमीवर पवना धरण प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षाने नदीकाठच्या ग्रामस्थ, शेतकरी आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला(Pawana Dam Water) आहे.
शेतीची अवजारे, वाहने आणि जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा
धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर तसेच सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीपात्रात किंवा नदीकाठावर उभी असलेली वाहने, शेतीची अवजारे, कृषी पंप तसेच पाळीव जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असे प्रशासनाने आवाहन केले (Pawana Dam Water)आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यापूर्वी जलसंपदा विभागाकडून अधिकृत माहिती प्रसारित करण्यात येईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जिल्हा व तालुका प्रशासन तसेच जलसंपदा विभागाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही पूर नियंत्रण कक्षाने केले (Pawana Dam Water)आहे.
