(पिंपरी, दि. २४ जुलै २०२६) : शहरातील सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छतागृह अधिक स्वच्छ, सुरक्षित, सुलभ आणि सर्वसमावेशक करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सार्वजनिक स्वच्छतागृह धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या धोरणात नागरिकांच्या सूचना व अनुभवांचा समावेश करण्यासाठी निगडी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात विविध समाजघटकांच्या प्रतिनिधींसोबत केंद्रित गटचर्चा आयोजित करण्यात (Public Toilet policy) आली.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या नेतृत्वात आरोग्य विभागामार्फत धोरणाचा मसुदा तयार केला जात आहे. चर्चेत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, निवासी संघटनांचे (आरडब्ल्यूए), तृतीयपंथी समाजाचे प्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सदस्यांनी सहभाग (Public Toilet policy)घेतला.
दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा, ज्येष्ठांसाठी वापरण्यास सोयीस्कर रचना, तृतीयपंथी नागरिकांसाठी सन्मानपूर्वक सुविधा, नियमित स्वच्छता, अखंड पाणीपुरवठा, प्रकाशयोजना, सुरक्षितता, वेळेवर दुरुस्ती आणि प्रभावी देखभाल यांसह नागरिकांचा व्यवस्थापनातील सहभाग वाढविण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना मांडण्यात (Public Toilet policy)आल्या.
उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले की, नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सूचना सार्वजनिक स्वच्छतागृह धोरण अधिक सर्वसमावेशक आणि नागरिकाभिमुख बनविण्यास उपयुक्त ठरतील. गटचर्चेतील शिफारशींचा अंतिम धोरणात समावेश करून शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह सेवा अधिक दर्जेदार, सुलभ आणि परिणामकारक करण्याचा महापालिकेचा प्रयत्न (Public Toilet policy)आहे.
