(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील नवनियुक्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत नियुक्ती देण्यात आली आहे. याबाबत प्रशासनाकडून संबंधित कर्मचाऱ्यांना अधिकृत कार्यालयीन आदेश जारी करण्यात आले (PCMC Employees)आहेत.
या आदेशानुसार, सर्व नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संबंधित विभागप्रमुखांकडे हजर राहून सेवेत रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले(PCMC Employees) आहेत.
सेवेत रुजू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना सकाळी ११ ते सायंकाळी ६ या कार्यालयीन वेळेत नियमित कर्तव्य बजावणे बंधनकारक राहील. रुजू होताना मूळ कागदपत्रे, ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावी (PCMC Employees)लागतील.
महापालिकेची सेवा नियमावली, महाराष्ट्र नागरी सेवा नियम, शिस्त व आचारसंहिता तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन करणे कर्मचाऱ्यांना बंधनकारक राहणार आहे. कर्तव्यात कसूर, विनापरवानगी अनुपस्थिती किंवा नियमभंग केल्यास प्रचलित नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. दिलेल्या तारखेला आणि वेळेत रुजू न झाल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निर्णय घेतला (PCMC Employees)जाईल.
पाणीपुरवठा विभागाच्या विभागप्रमुखांनी हे आदेश जारी केले असून, नवनियुक्त कर्मचाऱ्यांना भावी सेवाकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या (PCMC Employees)आहेत.
