(पिंपरी, दि. १४ ऑगस्ट २०२६) : मोशी येथील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ जणांच्या कुटुंबीयांना महापौर रवि लांडगे यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली. वाढदिवसाचा जल्लोष टाळून कै. अंकुशराव लांडगे प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही मदत करण्यात (Ravi Landge)आली.
मोशी दुर्घटनेत अनेक कुटुंबांचा आधार हिरावला गेल्याने वाढदिवस साजरा करण्याऐवजी दुःखात असलेल्या कुटुंबांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय महापौर लांडगे यांनी घेतला. पत्रकार परिषदेदरम्यान मृतांच्या नातेवाईकांकडे मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात (Ravi Landge) आले.
मृत भावेश वाणी, अक्षय सावंत, सुनील कोरके, सन्नी माने, महेश कुंभार, नागेश गायकवाड, रणजीत पाटील, राहुल गायकवाड आणि वामन कसबे यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात (Ravi Landge)आले.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेविका योगिता नागरगोजे, राहुल लांडगे तसेच मृतांच्या कुटुंबीयांची उपस्थिती (Ravi Landge)होती.
महापौर रवि लांडगे म्हणाले, “नऊ कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना वाढदिवसाचा जल्लोष करणे मनाला पटणारे नाही. त्यांच्या दुःखात सहभागी होऊन पाठीशी उभे राहणे, हाच माझ्यासाठी वाढदिवसाचा खरा अर्थ आहे. आर्थिक मदतीने प्रिय व्यक्तीची उणीव भरून निघणार नाही; मात्र या कठीण काळात आपण एकटे नाही, हा विश्वास देण्याचा हा छोटासा प्रयत्न (Ravi Landge)आहे.”
कै. अंकुशराव लांडगे प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू आणि संकटग्रस्त नागरिकांना यापुढेही शक्य ती मदत करण्याचे कार्य सुरू ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात (Ravi Landge)आले.

