(पिंपरी, दि. १५ सप्टेंबर ): पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार, लेखक व साहित्यिक शिवाजीराव अमृतराव शिर्के (वय ८१) यांचे मंगळवारी (दि. १५ सप्टेंबर) निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत (Shivajirao Shirke Death)आहे.
शिवाजीराव शिर्के यांनी पत्रकारितेबरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले. पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समिती, पिंपरी-चिंचवड पत्रकार संघ तसेच फुगेवाडी ज्येष्ठ नागरिक संघ आदी संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. विविध सामाजिक आणि पत्रकारिता विषयक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग (Shivajirao Shirke Death)होता.
साहित्य क्षेत्रातही शिर्के यांनी आपल्या लेखणीचा ठसा उमटविला. ‘प्रवीण प्रकाशन’च्या माध्यमातून त्यांनी ‘महाराणी येसूबाई यांचा इतिहास’ हे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली असून, त्याला पारितोषिकही मिळाले
(Shivajirao Shirke Death)
होते.
‘राजे शिर्के घराण्याचा इतिहास’, ‘कृष्णाकाठ ते पवनाकाठ’ हे आत्मचरित्र, ‘कालभैरव’, ‘शिरकाण’ आदी पुस्तके तसेच अनेक कवितासंग्रह त्यांच्या लेखणीतून प्रकाशित झाले. सातारा जिल्ह्यातील उद्योजकांच्या कार्याचा परिचय करून देणारे ‘सातारचे रत्न’ हे पुस्तकही विशेष(Shivajirao Shirke Death)गाजले.
नाटक लेखनातही त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली. ‘पराचा कावळा’, ‘ही पैशाची किमया’ आदी नाटकांचे लेखन त्यांनी केले. पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ कार्याचा ठसा कायम स्मरणात राहणार(Shivajirao Shirke Death)आहे.
शिवाजीराव शिर्के हे पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण शिर्के यांचे वडील, तर ओबीसी कल्याण विभागाचे सहसंचालक प्रशांत शामराव शिर्के यांचे चुलते होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली, जावई व नातवंडे असा परिवार(Shivajirao Shirke Death)आहे.
