पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे व पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार समारंभ चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते पिंपळे गुरव येथे पार(MLA Shankar Jagtap) पडला.
यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष अभिजित बारणे, आमदार शंकर जगताप, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, उपाध्यक्ष विवेक इनामदार, जिल्हा उपाध्यक्ष विजय गायकवाड, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रोहित खर्गे, महिला अध्यक्ष अर्चना मेंगडे आदी उपस्थित (MLA Shankar Jagtap) होते.
कार्यक्रमात कार्याध्यक्ष दादाराव आढाव, सचिव बजरंग मासाळ, खजिनदार संतोष जाधव, संपर्कप्रमुख संतोष महामुनी, संदीप सोनार, सदस्य शफिक शेख, विवेक कुलकर्णी, नागेश खजूरगीकर, सीताराम मोरे, लीना माने, पूनम पाटील, राजश्री आतकरे, संगीता पाचंगे आदी पत्रकारांचा आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात (MLA Shankar Jagtap)आला.

प्रास्ताविक करताना संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी म्हणाले, “चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप हे विकासासाठी झटणारे तसेच संयमी लोकप्रतिनिधी म्हणून परिचित आहेत. पत्रकारांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांना मी अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जनतेची कामे घेऊन जाताना पाहिले (MLA Shankar Jagtap)आहे.”
स्थायी समितीचे अध्यक्ष अभिजित बारणे यांच्याबाबत बोलताना जोशी म्हणाले की, चुकीच्या गोष्टी बाजूला ठेवून चांगल्या कामांना पुढे नेण्याची भूमिका घेणारे ते सक्षम लोकप्रतिनिधी (MLA Shankar Jagtap)आहेत.
तसेच मुंबई येथे झालेल्या संघाच्या अधिवेशनात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार भवनाबाबत संघाला दिलेल्या आश्वासनाची माहिती यावेळी देण्यात आली. त्या आश्वासनाच्या पत्राची प्रत आमदार शंकर जगताप यांना देण्यात आली. तसेच प्रस्तावित पत्रकार भवनाला स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे नाव देण्यात यावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात (MLA Shankar Jagtap)आली.
यावेळी स्वागतपर भाषणात आमदार शंकर जगताप म्हणाले की, पत्रकार संघाची पत्रकार भवनाची मागणी पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे सहकार्य करण्यात येईल. संघाची कार्यकारिणी सर्वसमावेशक असून प्रदेशाध्यक्ष किरण जोशी हे आपल्या शहराचे राज्यव्यापी प्रतिनिधित्व करत आहेत, ही अभिमानाची बाब (MLA Shankar Jagtap)आहे.
“जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही,” असे आश्वासनही आमदार शंकर जगताप यांनी यावेळी (MLA Shankar Jagtap)दिले.
उपाध्यक्ष विवेक इनामदार यांनी संघाच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये पत्रकारांना हेल्मेट वाटप, आरोग्य विमा, पत्रकारांसाठी स्वस्त व हक्काची घरे तसेच अन्य कल्याणकारी योजनांचा समावेश असल्याचे त्यांनी (MLA Shankar Jagtap)सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक इनामदार यांनी केले, तर आभार पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रोहित खर्गे यांनी (MLA Shankar Jagtap) मानले.
