पिंपरी, दि. १४ जून २०२६ : प्राधिकरण येथील गदिमा नाट्यगृहात विविध भारती म्युझिकल इव्हेंटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर’ या हिंदी व मराठी चित्रपट गीतांच्या बहारदार सांगीतिक मैफलीला रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद (Musical Concert)लाभला.
कार्यक्रमास दिशा सोशल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, सुचिता शेटे, ॲड. स्मिता शेटे, उषा शेटे, पिंपरी-चिंचवड शिवसेना (शिंदे गट) प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, नेहा चौधरी, मुकेश चौधरी, विलास गाधडे, मोहन भस्मे, विकास जगताप, पांडुरंग म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वंदना पगारे यांचे अभीष्टचिंतन करण्यात (Musical Concert)आले.
तसेच लॉजिस्टिक्स क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पीथमपूर बॉम्बे कंपनीला जागतिक दर्जाच्या नेल्सन ग्लोबल कंपनीकडून प्राप्त विशेष पुरस्कारानिमित्त स्मिता विजयन, सचिन शेटे, प्रदीप अमोलू आणि विंशा अमोलू यांचा विविध भारती म्युझिकल इव्हेंट समूहाच्या वतीने सत्कार करण्यात(Musical Concert) आला.
ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर रंगलेल्या मैफलीत नंदकुमार कांबळे, विनायक कदम, राजेंद्र पगारे, शुभांगी पवार, नेहा दंडवते, पंकज कथलकर, सूर्यकांत ताम्हाणे, सुहासिनी कंझरकर, पूनम झांबरे, डॉ. कविता बोंडे, संजय पाटील, विलास खरे, अजय सोलंकी, सतीश कापडी आणि सुनील जोशी यांनी आपल्या सुमधुर आवाजात हिंदी व मराठी गीतांचा खजिना रसिकांसमोर खुला (Musical Concert)केला.
‘रहे ना रहे हम’, ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’, ‘तुमसे ओ हसीना’, ‘जीना क्या अजी प्यार बिना’, ‘मेरे मेहबूब कयामत होगी’ आणि ‘तूने ओ रंगीले कैसा जादू किया’ यांसारख्या अजरामर हिंदी गीतांसह अनेक लोकप्रिय मराठी गीतांनाही श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. अनेक गाण्यांना ‘वन्स मोअर’ची मागणी होत (Musical Concert)होती.
विशेष आकर्षण ठरलेल्या सादरीकरणात विलास खरे यांनी ‘हैं अपना दिल तो आवारा’ हे लोकप्रिय गीत माऊथ ऑर्गनवर सादर करून उपस्थितांची वाहवा (Musical Concert)मिळवली.
दृकश्राव्य कराओके गीतांच्या या विनामूल्य मैफलीचे ध्वनिसंयोजन राजेंद्र देसाई यांनी केले, तर विक्रम अंबिके यांनी दृकश्राव्य चित्रणाची जबाबदारी सांभाळली. नेहा दंडवते आणि शुभांगी पवार यांनी खुसखुशीत शैलीत सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी विनायक कदम यांनी उपस्थितांचे आभार(Musical Concert) मानले.
