पुणे : राज्यातील इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दुसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ६ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी, अर्जातील दुरुस्ती तसेच पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ही प्रक्रिया ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार (FYJC Second Round)आहे.
शिक्षण संचालनालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यभरातील १२.५१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून सुमारे ४.५१ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. दुसऱ्या फेरीतील प्रवेश वाटप यादी १३ जून रोजी प्रसिद्ध होणार असून विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज लॉक करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती आणि वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध(FYJC Second Round) आहे.
