(पिंपरी, प्रतिनिधी दि. २२) : मोशी कचरा डेपो येथे ८ जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ जणांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने वेगाने सुरू केली आहे. महापौर रवि लांडगे यांच्या निर्देशानुसार आवश्यक प्रशासकीय कार्यवाही युद्धपातळीवर सुरू असून, कागदपत्रांची पूर्तता लाभार्थ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी (Moshi Garbage Depot)दिली.
मृत सन्नी माने यांच्या पत्नी मनीषा माने आणि आई फौजिया अझीम माने यांच्या खात्यात प्रत्येकी ५ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. मृत राहुल गायकवाड यांच्या पत्नी भाग्यश्री गायकवाड यांच्या खात्यात ५ लाख रुपये, तर आई सरस्वती गायकवाड आणि वडील अर्जुन गायकवाड यांच्या खात्यात प्रत्येकी २.५० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. तसेच मृत वामन कसबे यांच्या पत्नी सुमन कसबे यांच्या खात्यात १० लाख रुपयांची मदत जमा करण्यात आली (Moshi Garbage Depot) आहे .
यापूर्वी मृत अक्षय सावंत यांच्या कायदेशीर वारसांच्या खात्यातही नियमानुसार १० लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली (Moshi Garbage Depot)आहे.
दुर्घटनेतील मृत भावेश वाणी, सुनील कोरके, महेश कुंभार, नागेश गायकवाड आणि रणजीत पाटील यांच्या वारसांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, ती पूर्ण होताच त्यांच्या खात्यातही आर्थिक मदतीची रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी (Moshi Garbage Depot) सांगितले.
कोट :
“मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जात आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होताच पात्र वारसांच्या खात्यात मदतीची रक्कम थेट जमा केली जात आहे. उर्वरित लाभार्थ्यांची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात असून ती लवकर पूर्ण करण्यात येईल.”
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, (Moshi Garbage Depot) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
कोट :
“मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने दिलासा मिळावा, ही महानगरपालिकेची भूमिका आहे. कोणत्याही पात्र लाभार्थ्याला आर्थिक मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी प्रशासनाला त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या (Moshi Garbage Depot) आहेत.”
— रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.
