(पिंपरी,प्रतिनिधी दि. ४) : पिंपरी-चिंचवड शहरात मान्सून सक्रिय झाला असून पुढील काही दिवस मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाने केले (Monsoon Safety) आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यांमुळे झाडे उन्मळून पडणे किंवा फांद्या तुटून पडण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी वाहनांचे पार्किंग झाडाखाली करू नये तसेच वादळी वातावरणात झाडाखाली थांबणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले (Monsoon Safety)आहे.
नागरिकांच्या परिसरात एखादे झाड धोकादायक स्थितीत असल्याचे किंवा झाडाच्या फांद्या पडण्याचा धोका असल्याचे आढळल्यास त्याची तात्काळ माहिती महापालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाला द्यावी. तसेच वीजवाहिन्यांना झाडांच्या फांद्यांचा स्पर्श होत असल्यास संबंधित विभागाला त्वरित कळवावे, जेणेकरून आवश्यक कार्यवाही करता (Monsoon Safety) येईल.
झाडांच्या फांद्या छाटणीसाठी परवानगी, धोकादायक वृक्षांबाबत तक्रार किंवा झाड पडल्यास नागरिकांनी आपल्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील उद्यान विभागाशी संपर्क साधावा. यासाठी महापालिकेने सर्व क्षेत्रीय कार्यालयांसाठी स्वतंत्र संपर्क क्रमांक जाहीर केले असून आपत्कालीन परिस्थितीत त्यांचा उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आले (Monsoon Safety) आहे.
याशिवाय समन्वयासाठी उद्यान अधीक्षक श्री. योगेश वाळूंज (८८२८६१८०३०) आणि सहाय्यक उद्यान अधीक्षक श्री. राजेश वसावे (९९२२५०११०४) यांच्याशीही संपर्क साधता येणार आहे. मान्सून काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उद्यान व वृक्षसंवर्धन विभाग २४ तास सज्ज असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले (Monsoon Safety) आहे.
