(विवेक कुलकर्णी चंदीगड) : अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय संघाने दुसऱ्या दिवसअखेर विजयाच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. फलंदाजांनी उभारलेल्या ५६४ धावांच्या भक्कम धावसंख्येनंतर गोलंदाजांनीही प्रभावी मारा करत अफगाणिस्तानला ५ बाद ११३ धावांवर रोखले. त्यामुळे पाहुण्या संघावर फॉलोऑनचे संकट गडद झाले (INDvsAFG) आहे.
दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला कर्णधार शुभमन गिलने आपल्या शानदार खेळीची पुढे वाटचाल करत १२६ धावा केल्या. त्यानंतर ध्रुव जुरेलने आक्रमक शैलीत खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र तो १९ धावांवर बाद झाला. ऋषभ पंतने मात्र संयमी आणि परिपक्व फलंदाजीचे दर्शन घडवले. नेहमीच्या आक्रमक शैलीला थोडा लगाम घालत त्याने ८१ धावांची मौल्यवान खेळी साकारली. शतकापासून तो दूर राहिला असला तरी त्याच्या या खेळीने संघाचा डाव अधिक मजबूत (INDvsAFG)केला.
वॉशिंग्टन सुंदरने पुन्हा एकदा खालच्या फळीतील आपली उपयुक्तता सिद्ध करत नाबाद ५२ धावा केल्या. त्यानंतर भारताने ५६४ धावांवर डाव घोषित(INDvsAFG) केला.
मात्र दिवसातील सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते पदार्पणवीर मानव सुथारने. फलंदाजीत छोटी पण आत्मविश्वासपूर्ण खेळी करून त्याने आपली क्षमता दाखवली आणि त्यानंतर गोलंदाजीत तर अफगाणिस्तानच्या फलंदाजांना अक्षरशः हैराण केले. पदार्पणाच्या कसोटीतच पहिल्याच षटकात विकेट मिळवण्याचा पराक्रम त्याने केला. दिवसअखेर त्याच्या खात्यात तीन बळी जमा झाले (INDvsAFG) होते.
मानव सुथारची ही कामगिरी भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत सकारात्मक मानली जात आहे. खालच्या फळीत उपयुक्त धावा आणि त्यानंतर प्रभावी गोलंदाजी अशा अष्टपैलू योगदानामुळे तो आगामी काळात भारतीय संघासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू झाली(INDvsAFG) आहे.
अफगाणिस्तानची सुरुवात प्रसिद्ध कृष्णाने अटलला बाद करत खिळखिळी केली. त्यानंतर मानव सुथार आणि कृष्णा यांनी प्रत्येकी तीन बळी घेत भारतीय संघाला पूर्णपणे वरचष्मा मिळवून दिला. दुसऱ्या दिवसअखेर अफगाणिस्तानची धावसंख्या ५ बाद ११३ अशी झाली असून फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना अजून २५२ धावांची गरज (INDvsAFG) आहे.
दोन दिवसांच्या खेळानंतर भारतीय संघ सर्वच विभागांत सरस ठरला असून सामन्याचा निकाल आता केवळ औपचारिकता राहिल्याचे चित्र दिसत आहे. भारतीय संघाच्या दृष्टीने कर्णधार गिलचे शतक, पंतची जबाबदार खेळी, सुंदरचे अर्धशतक आणि विशेषतः मानव सुथारचे अष्टपैलू प्रदर्शन ही या दिवसाची प्रमुख वैशिष्ट्ये(INDvsAFG) ठरली.
