(पुणे, प्रतिनिधी ): पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक स्नेहमेळाव्यात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते कवयित्री शामला रामचंद्र पंडित (दीक्षित) यांच्या १८व्या ‘मधुकुंज’ या सचित्र व रंगीत कवितासंग्रहाचे प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे करण्यात आले. या पुस्तकाचे प्रकाशन प्रणाली प्रकाशन, पुणे यांच्या माध्यमातून करण्यात आले (Shamla Pandit Madhukunj)आहे.
‘मधुकुंज’ या काव्यसंग्रहाला सुनेत्रा अजित पवार यांचे शुभेच्छापत्र लाभले आहे. ज्येष्ठ साहित्यिक व ग्रामीण कथाकार बबन पोतदार यांनी पुस्तकाला आशयघन व प्रासादिक प्रस्तावना लिहिली आहे. तसेच राजज्योतिषी व लेखक दत्तात्रय अत्रे, माजी शिक्षणाधिकारी कल्याण पानगे, अध्यापिका, लेखिका व कवयित्री शारदा पानगे आणि आकुर्डी येथील श्री म्हाळसाकांत विद्यालयाच्या अध्यापिका कविता खुटवड यांनीही पुस्तकाला शुभेच्छा दिल्या (Shamla Pandit Madhukunj)आहेत.
या संग्रहात विविध काव्यप्रकारांचा समावेश असून, सचित्र व रंगीत मांडणीमुळे पुस्तकाला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे. सौ. सोनाली दीपक मोरे यांनी पुस्तकाचे लेआउट केले असून, दीपक मोरे यांनी उत्कृष्ट बांधणी केली आहे. प्रणाली प्रकाशनच्या कु. प्रणाली पंडित यांच्या माध्यमातून पुस्तकाची निर्मिती करण्यात आली. श्री. दराडे यांनी पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ व मलपृष्ठ साकारले(Shamla Pandit Madhukunj) आहे.
प्रकाशन सोहळ्यास महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव, सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सविता नाणेकर, उपाध्यक्ष डॉ. विलास वाणी, सचिव बंडू दातीर, खजिनदार चंद्रशेखर वाघमारे, अनिल देवकाते, सेवक कल्याण निधीचे अध्यक्ष डॉ. तुषार शितोळे, सचिव श्रीहरी लवांडे, ग्राहक संस्थेचे अध्यक्ष संतोष पठारे, सचिव अनिल जाचक आदी उपस्थित(Shamla Pandit Madhukunj) होते.
तसेच संस्थेच्या विविध शाखांतील प्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, अध्यापकवृंद, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित(Shamla Pandit Madhukunj) होते.



