चिंचवड : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आमदार शंकरभाऊ जगताप मित्र परिवार’तर्फे शहरात एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांना जेवणासाठी प्लेट वाटप करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला (MLA Shankar Jagtap)आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च आणि होर्डिंगबाजी टाळून विद्यार्थ्यांच्या दैनंदिन उपयोगी पडणारी वस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ शहरातील विविध महापालिका शाळांमध्ये करण्यात आला असून, टप्प्याटप्प्याने सर्व विद्यार्थ्यांपर्यंत प्लेटचे वितरण केले जात(MLA Shankar Jagtap) आहे.
या वेळी महापौर रवीभाऊ लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, तसेच विविध प्रभागांतील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्लेट वाटप करण्यात(MLA Shankar Jagtap) आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून केलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरत असल्याची प्रतिक्रिया विविध मान्यवरांनी व्यक्त केली(MLA Shankar Jagtap) आहे.
