प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत गांजासह एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून ४०६ ग्रॅम गांजा, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई म्हसोबा मंदिराजवळील पायवाट परिसरात करण्यात (Ganja Seized) आली.
याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई संतोष बिभीषण सपकाळ यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश तुकाराम शिंगे (वय ३५, रा. संजीव हॉटेल चौक, ओटा स्कीम, निगडी) याला अटक करण्यात आली(Ganja Seized) आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मे रोजी दुपारच्या सुमारास म्हसोबा मंदिराजवळील पायवाट परिसरात एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे विक्रीसाठी आणलेला ४०६ ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच आरोपीकडून रोख रक्कमही जप्त करण्यात (Ganja Seized)आली.
प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपीने हा गांजा निगडीतील ओटा स्कीम परिसरात राहणाऱ्या सपना साठे नावाच्या महिलेकडून विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास निगडी पोलीस करत (Ganja Seized) आहेत.
