(आकुर्डी, दि. ९ जुलै ): जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आकुर्डीतील विवेकनगर परिसरात गेल्या २८ वर्षांपासून सुरू असलेला सेवाभावी दिंडी स्वागत सोहळा यंदाही भक्तिमय वातावरणात पार पडला. वैकुंठवासी जमुनाबाई लढ्ढा यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली ही सेवा परंपरा यंदाही उत्साहात जपण्यात (Dindi Swagat Sohala) आली.
गंगा अपार्टमेंट, तुळजामाता मंदिरामागील परिसरात दिंडीचे आगमन झाल्यानंतर वारकऱ्यांचे पुष्पवृष्टी आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर हरिपाठ, भजन आणि नामस्मरणाचा कार्यक्रम भक्तिभावाने पार(Dindi Swagat Sohala) पडला.
यानंतर सुमारे २,५०० वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सेवाभाव, भक्ती आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला (Dindi Swagat Sohala) मिळाला.
या उपक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक उल्हास शेट्टी, महेश बँक, पुणेचे उपाध्यक्ष अजय लढ्ढा, तरुण मित्र मंडळ, गंगा अपार्टमेंट मंडळ आणि महेश सांस्कृतिक मंडळ (पिंपरी-चिंचवड) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात (Dindi Swagat Sohala) आले.

कार्यक्रमादरम्यान परिसरात संपूर्ण वेळ हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. वारकऱ्यांनी आयोजकांच्या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करत कृतज्ञता व्यक्त (Dindi Swagat Sohala) केली.
