(पिंपरी-चिंचवड, दि. १९ ऑगस्ट) : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भेसळखोरीविरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या जीवितास गंभीर धोका असल्याचा दावा करण्यात आला आहे. तुकाराम मुंडे यांना लक्ष्य करण्यासाठी अंडरवर्ल्ड टोळ्यांना तब्बल २५ कोटी रुपयांची सुपारी दिल्याची माहिती मिळाल्याचा दावा नागरिकांनी केला असून, त्यांच्या सुरक्षेचा तातडीने आढावा घेऊन झेड प्लस सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी करण्यात आली (Tukaram Mundhe Security)आहे.
याबाबत मारुती साहेबराव भापकर, मानव कांबळे, डॉमिनिक लोबो, राजू साबळे आणि प्रकाश जाधव यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांना निवेदन दिले (Tukaram Mundhe Security)आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून भेसळखोरीविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे संबंधित भेसळखोरांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याविरोधात संभाव्य धोका निर्माण झाल्याची चिंता व्यक्त करण्यात आली (Tukaram Mundhe Security)आहे.
निवेदनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या गोपनीय सूत्रांकडून मुंडे यांना कायमस्वरूपी संपविण्यासाठी २५ कोटी रुपयांची सुपारी दिल्याची गंभीर माहिती मिळाली आहे. या माहितीची सत्यता अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेली नसून, सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांनी या दाव्याची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली (Tukaram Mundhe Security)आहे.
तुकाराम मुंडे यांच्या जीवितास कोणताही संभाव्य धोका निर्माण होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या सुरक्षेचा तातडीने आढावा घेऊन आवश्यकतेनुसार झेड प्लस अथवा योग्य स्तराची सुरक्षा प्रदान करावी, तसेच कथित धमकीमागील व्यक्ती किंवा गुन्हेगारी घटकांचा शोध घ्यावा, अशी मागणी करण्यात आली (Tukaram Mundhe Security)आहे.

