(विवेक कुलकर्णी )IPL 2026 मध्ये करो किंवा मरो परिस्थितीत मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न अखेर संपुष्टात आले. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने (GT) चेन्नईवर तब्बल ९० धावांनी दणदणीत विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले, तर चेन्नईचा यंदाच्या हंगामातील प्रवासही इथेच (GT Beat CSK) संपला.
संपूर्ण मोसमात सातत्याचा अभाव जाणवलेल्या चेन्नईसमोर या सामन्यात विजय अनिवार्य होता. मात्र गुजरातच्या आक्रमक फलंदाजीसमोर आणि भेदक गोलंदाजीसमोर चेन्नई पूर्णपणे हतबल (GT Beat CSK)दिसली.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा चेन्नईचा निर्णय गुजरातच्या सलामीवीरांनी चुकीचा ठरवला. कर्णधार शुभमन गिल आणि युवा फलंदाज साई सुदर्शन यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत चेन्नईच्या गोलंदाजांवर वर्चस्व (GT Beat CSK) गाजवले.
दोघांनी अवघ्या १२ षटकांत १२५ धावांची भागीदारी उभारली. साई सुदर्शन शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता, मात्र अंशुल कंबोजने त्याला ८४ धावांवर बाद केले. त्यानंतर शुभमन गिल आणि जोस बटलर यांनी तुफानी फटकेबाजी करत संघाला २०० धावांचा टप्पा पार करून (GT Beat CSK)दिला.
निर्धारित २० षटकांत गुजरातने ४ बाद २२९ धावांचा डोंगर (GT Beat CSK) उभारला.
चेन्नईची निराशाजनक फलंदाजी
२३० धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात अत्यंत खराब झाली. भरोसेमंद संजू सॅमसन खातेही न उघडता बाद झाला, तर कर्णधार ऋतुराज गायकवाडला केवळ १६ धावाच करता (GT Beat CSK)आल्या.
सुरुवातीचे धक्के बसल्यानंतर चेन्नईचा डाव कधीच सावरू शकला नाही. शिवम दुबेने ४७ धावांची झुंजार खेळी करत लढण्याचा प्रयत्न केला, मात्र दुसऱ्या बाजूने त्याला अपेक्षित साथ मिळाली (GT Beat CSK)नाही.
गुजरातच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत चेन्नईचा संपूर्ण संघ १४० धावांत गुंडाळला आणि ९० धावांनी मोठा विजय (GT Beat CSK)नोंदवला.
सिराज-रबाडाची भेदक गोलंदाजी
गुजरातच्या विजयात मोहम्मद सिराज आणि कागिसो रबाडा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सिराजने सुरुवातीलाच चेन्नईला धक्के देत ३ बळी घेतले, तर रबाडानेही प्रभावी गोलंदाजी करत ३ विकेट्स आपल्या नावावर (GT Beat CSK)केल्या.
या विजयासह गुजरात टायटन्सने गुणतालिकेत पहिले स्थान मजबूत केले, तर चेन्नई सुपर किंग्जचे प्लेऑफचे आव्हान अधिकृतपणे संपुष्टात (GT Beat CSK)आले.
संक्षिप्त धावफलक
गुजरात टायटन्स : २० षटकांत ४ बाद २२९
साई सुदर्शन ८४, शुभमन गिल ६४, जोस बटलर ५७
चेन्नई सुपर किंग्ज : १४० सर्वबाद
शिवम दुबे ४७, अंशुल कंबोज १९, ऋतुराज गायकवाड १६
गोलंदाजी :
मोहम्मद सिराज ३/२६, कागिसो (GT Beat CSK)रबाडा ३/३४
