(*पिंपरी, दि. २० जुलै २०२६*) : भारत निवडणूक आयोगाने राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यातील अलीकडील अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी केलेली मुदतवाढीची विनंती मान्य करत आयोगाने हा निर्णय घेतला (Voter List) आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या माध्यमातून घरभेटी घेऊन गणना प्रपत्र संकलित करण्याची मोहीम आता ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचनेची प्रक्रिया देखील ८ ऑगस्टपर्यंत पूर्ण केली जाणार(Voter List) आहे.
यानंतर १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मतदारांना दावे व हरकती दाखल करता येतील. तसेच १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नोटिसा देणे, सुनावणी घेणे आणि दावे-हरकतींचा निपटारा करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार (Voter List) आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व पात्र मतदारांनी बीएलओ आपल्या घरी भेट दिल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह गणना प्रपत्र भरून द्यावे किंवा संबंधित मतदान केंद्रावर जाऊन ते सादर करावे. मतदार यादी अचूक, अद्ययावत व सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून निवडणूक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले (Voter List) आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “मतदार यादी ही लोकशाहीचा मूलभूत पाया आहे. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत अचूकपणे समाविष्ट होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला मिळालेली मुदतवाढ ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची संधी आहे. पिंपरी चिंचवडमधील सर्व नागरिकांनी बीएलओंना आवश्यक सहकार्य करून गणना प्रपत्र वेळेत भरावे आणि लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपले योगदान (Voter List) द्यावे.
अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी सांगितले की, “महापालिकेच्या सर्व यंत्रणांना सुधारित वेळापत्रकानुसार प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत. बीएलओंना नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे वेळेवर उपलब्ध करून दिल्यास पुनरीक्षणाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि अचूक होईल. पात्र मतदारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता गणना प्रपत्र तातडीने भरून (Voter List) द्यावे.”
*असे असेल सुधारित वेळापत्रक* :
* *३० जून ते ८ ऑगस्ट २०२६* – बीएलओंच्या गृहभेटी व गणना प्रपत्र संकलन
* *८ ऑगस्ट २०२६* – मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना पूर्ण
* *१७ ऑगस्ट २०२६* – प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
* *१७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६* – दावे व हरकती स्वीकारणे
* *१७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६* – सुनावणी व दावे-हरकतींचा निपटारा
* *१९ ऑक्टोबर २०२६* – अंतिम मतदार यादी (Voter List) प्रसिद्ध
