(पिंपरी | प्रतिनिधी):मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी कचरा व्यवस्थापन, आपत्ती निवारण आणि भविष्यातील नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. प्रशासनाने कचरा व्यवस्थापनासाठी सुचविलेल्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थायी समिती, शहर सुधारणा समिती आणि मित्रपक्षांचे पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी (Abhishek Barne) दिली.
महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत बारणे म्हणाले की, शहरातील कचऱ्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रभाग स्तरावर अत्याधुनिक कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा विचार व्हावा. पुणावळे कचरा डेपोबाबत कोणताही निर्णय झालेला नसून, याबाबत नागरिकांनी गैरसमज करून घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट (Abhishek Barne)केले.
पर्यायी जागांचा विचार करताना देहूरोड कॅन्टोन्मेंटची जागा उपलब्ध होऊ शकत असल्यास आमदार शंकर जगताप, इतर लोकप्रतिनिधी आणि खासदार यांच्या सहकार्याने प्रयत्न करावेत. तसेच नदीपात्रालगतच्या जागा किंवा बंद पडलेल्या खाणींचाही पर्याय म्हणून विचार करता येईल, असे त्यांनी (Abhishek Barne) सुचवले .
कचरा विलगीकरणावर भर
ओला आणि सुका कचरा विलगीकरणाची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यावश्यक असल्याचे सांगत बारणे यांनी संबंधित एजन्सी, कनिष्ठ अभियंते, उपअभियंते आणि अधिकाऱ्यांनी यावर कठोर नियंत्रण ठेवावे, असे निर्देश दिले. नियमांची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास कचरा व्यवस्थापन अधिक परिणामकारक होईल, असे त्यांनी नमूद (Abhishek Barne)केले .
आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची मागणी
पावसाळ्यात विद्युत वाहिन्यांजवळ खड्ड्यांमध्ये पाणी साचून नागरिकांना शॉक बसण्याच्या घटना घडत असल्याकडे लक्ष वेधत त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाने धोकादायक डीपी बॉक्स, उघडे विद्युत जोड, रस्त्यांवरील खड्डे आणि धोकादायक झाडांची नियमित तपासणी करावी, अशी मागणी (Abhishek Barne)केली.
तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून धोकादायक झाडे, तुंबलेली गटारे आणि इतर जोखमीच्या ठिकाणांची माहिती संबंधित विभागांपर्यंत तातडीने पोहोचेल, अशी यंत्रणा उभारण्याची सूचना त्यांनी केली. भविष्यात पूरस्थिती टाळण्यासाठी व्यापक कृती आराखडा तयार करण्यासाठी शहर सुधारणा समिती, शिक्षण समिती आणि स्थायी समितीचे पूर्ण सहकार्य राहील, असेही त्यांनी (Abhishek Barne)सांगितले.
पीडितांच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न
मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त आर्थिक मदत, पुनर्वसन आणि आवश्यक असल्यास घर उपलब्ध करून देण्याचा विचार करावा. जखमींनाही आवश्यक आर्थिक व वैद्यकीय मदत मिळावी, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना विविध माध्यमांतून सहाय्य मिळण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी बारणे यांनी (Abhishek Barne) केली.
दुर्घटनेवेळी जीवाची पर्वा न करता बचावकार्य करणाऱ्या महापालिकेच्या अग्निशमन दल, एनडीआरएफ, लष्कर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांनी विशेष आभार (Abhishek Barne)मानले.
आयुक्त काय म्हणाले?
सभेला उत्तर देताना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, आपत्तीच्या काळात प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील झोनल अधिकारी ‘इन्सिडेंट कमांडर’, तर कार्यकारी अभियंते ‘डेप्युटी इन्सिडेंट कमांडर’ म्हणून काम करतील. सर्व विभागांचे समन्वयित कामकाज त्यांच्या नियंत्रणाखाली राहील आणि त्यासाठी आवश्यक अधिकारही देण्यात आले (Abhishek Barne)आहेत.
याशिवाय शहरातील दहा क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर ‘वेस्ट टू एनर्जी’ अथवा ‘वेस्ट टू सीएनजी’ प्रकल्प उभारण्याचे नियोजन सुरू असून, इच्छुक संस्थांशी चर्चा करून लवकरच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट (Abhishek Barne)केले.
