पिंपरी : शहरातील वाढत्या धूळ व वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कठोर पावले उचलत आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) प्रकल्पांवर विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. या मोहिमेत नियमभंग करणाऱ्या चार प्रकल्पांवर तात्काळ सील (लाखबंद) करण्याची कारवाई करण्यात (RMC Plants) आली.
महापौर रवि लांडगे यांच्या सूचनेनुसार पर्यावरण अभियांत्रिकी विभाग आणि उपद्रव शोध पथकाने पुनावळे, मोशी आणि पिंपळे सौदागर परिसरातील एकूण १० आरएमसी प्रकल्पांची पाहणी केली. तपासणीदरम्यान चार प्रकल्पांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या. धूळ नियंत्रणासाठी आवश्यक यंत्रणा नसणे, स्वच्छतेचा अभाव आणि कच्चा माल उघड्यावर साठवणे यामुळे प्रदूषण वाढत असल्याचे स्पष्ट (RMC Plants)झाले.
यानुसार मोशीतील फरांदे आरएमसी, चिंचवडमधील यश आरएमसी, मोशीतील राम ग्रुप क्रिस्टल वन आरएमसी आणि पिंपळे सौदागर येथील आसवानी असोसिएट्स जी.के. आरएमसी या चार प्रकल्पांवर तात्काळ सीलची कारवाई करण्यात (RMC Plants) आली.
इतर प्रकल्पांना धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून, नियमांचे पालन न केल्यास आणखी कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. शहरातील बांधकाम आणि औद्योगिक प्रकल्पांवर महापालिकेचे सतत लक्ष राहणार(RMC Plants) आहे.
महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, धूळ प्रदूषण हे नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका असून त्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. “नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई सातत्याने आणि कठोरपणे केली जाईल. नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण देणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे,” असे त्यांनी स्पष्ट (RMC Plants) केले.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही वायू प्रदूषण नियंत्रणाला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत, “पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन आवश्यक असून कोणताही नियमभंग सहन केला जाणार नाही,” असे नमूद (RMC Plants) केले.
मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी, “प्रदूषण नियंत्रणासाठी केवळ नियम नव्हे तर प्रभावी अंमलबजावणी महत्त्वाची आहे. तपासणी मोहीम अधिक तीव्र करून पुढील काळातही कारवाई सुरू राहील,” असा इशारा (RMC Plants) दिला.
महापालिका प्रशासनाकडून शहरातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि निरोगी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी अशा मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात(RMC Plants) आले.
