(पिंपरी, २४ ऑगस्ट) : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे क्षुल्लक वादातून केसरेकर दाम्पत्याची हत्या झाल्याच्या घटनेनंतर राज्यभर संताप व्यक्त होत आहे. या घटनेवरून राजकारण न करता समाजाच्या संतापामागील भावना समजून घेण्याची गरज आहे, असे भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा प्रवक्ते राजाभाऊ दुर्गे यांनी म्हटले (Sangli Murder Case)आहे.
सांगलीतील निषेध मोर्चात भाजप आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाच्या) खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर दुर्गे यांनी प्रतिक्रिया देताना हा विषय महेश लांडगे विरुद्ध सुप्रिया सुळे असा वैयक्तिक संघर्ष करण्याचा नसून, निरपराध दाम्पत्याच्या हत्येचा असल्याचे स्पष्ट (Sangli Murder Case)केले.
कुपवाड येथे कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाले. या हल्ल्यात मनीषा केसरेकर यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती मोहन केसरेकर यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला (Sangli Murder Case)आहे.
कायदा हातात घेण्याचे समर्थन होऊ शकत नाही. आरोपींना शिक्षा देण्याचा अधिकार न्यायव्यवस्थेलाच आहे. मात्र अमानुष हत्याकांडानंतर समाजात निर्माण झालेल्या संतापाच्या भावनेलाच गुन्हा ठरविणे योग्य नाही, असे दुर्गे यांनी नमूद (Sangli Murder Case)केले.
महेश लांडगे यांच्या वक्तव्याच्या भाषेबाबत मतभेद असू शकतात; मात्र त्यामागील भावना गुन्हेगारांविरोधातील संतापाची होती, असा दावा त्यांनी केला. “पहिला वार माझ्यावर करा” असे आव्हान देण्याऐवजी सर्व राजकीय पक्षांनी “पहिला वार कोणत्याही निष्पाप नागरिकावर होऊ देणार नाही” अशी भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी (Sangli Murder Case)केले.
गुन्हेगाराला धर्म नसतो. आरोपीच्या धर्माच्या आधारावर संपूर्ण समाजाला दोषी ठरविणे चुकीचे असून, कोणत्याही धर्मातील निरपराध नागरिकांविरोधात द्वेष निर्माण होऊ नये, ही भूमिका स्पष्ट असली पाहिजे, असे दुर्गे यांनी (Sangli Murder Case) सांगितले.
महेश लांडगे यांना आवरण्यापेक्षा गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणे, हिंसक मानसिकतेवर कठोर कारवाई करणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी व्यवस्था उभी करणे आवश्यक आहे. केसरेकर दाम्पत्याला खरी श्रद्धांजली म्हणजे दोषींना कठोर शिक्षा मिळणे आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासन व समाजाने एकत्रितपणे काम करणे होय, असेही दुर्गे यांनी (Sangli Murder Case) म्हटले.



