(पिंपरी, दि. २६ ऑगस्ट २०२६) : राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गायक व संगीतकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठित ‘आशा भोसले पुरस्कार’ यंदा सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांना जाहीर झाला आहे. हा २१ वा ‘आशा भोसले पुरस्कार २०२६’ असून, शनिवारी (दि. २९ ऑगस्ट) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सायंकाळी ५ वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार(Asha Bhosle Award) आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा, पिंपरी-चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते श्रेया घोषाल यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती नाट्य परिषदेचे पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत (Asha Bhosle Award)दिली.

या सोहळ्यास विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, आमदार अमित गोरखे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्यासह कला व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार (Asha Bhosle Award)आहेत.
‘आशा भोसले पुरस्कार’चे स्वरूप १ लाख ११ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त मोरया थिएटर निर्मित ‘आशा से श्रेया तक’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. यामध्ये गानसम्राज्ञी आशा भोसले आणि श्रेया घोषाल यांच्या गाजलेल्या सदाबहार गीतांची सुरेल मैफल रसिकांना अनुभवता येणार(Asha Bhosle Award) आहे.
हा संपूर्ण कार्यक्रम संगीतप्रेमी आणि नागरिकांसाठी विनामूल्य असून, कार्यक्रमाच्या वेळेच्या अर्धा तास आधी प्रेक्षकांनी आसनस्थ व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आनंद घ्यावा, असे आवाहन भाऊसाहेब भोईर यांनी(Asha Bhosle Award) केले.
पत्रकार परिषदेला नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष किरण येवलेकर, कोषाध्यक्ष राजेंद्र बंग, सहकार्य संतोष रासने, गौरी लोंढे, सहकोषाध्यक्ष संतोष शिंदे आणि सदस्य सुदाम परब आदी उपस्थित (Asha Bhosle Award)होते.

या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी स्वतंत्र निवड समिती असून, ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, डॉ. रवींद्र घांगुर्डे, वंदना घांगुर्डे, दिलीप काटकर, राजेशकुमार साकला आणि भाऊसाहेब भोईर यांचा समितीत समावेश(Asha Bhosle Award) आहे.
