पिंपरी-चिंचवड : वाहनाची नंबरप्लेट लपवून वाहतूक पोलिसांचे चलन, आरटीओची कारवाई, स्पीड कॅमेरे आणि पोलिस नाकाबंदी टाळता यावी, यासाठी फॉर्च्युनरच्या मागील नंबरप्लेटवर बनावट फ्लिपिंग यंत्रणा बसविल्याचा प्रकार वाकडमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी वाहनमालकाविरुद्ध वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला (PCMC Crime News)आहे.
रोहिदास धोंडू बो-हाडे, पोलीस हवालदार, वाकड वाहतूक विभाग यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फॉर्च्युनर चालक व मालक विजय भगवान दगडे (रा. ताथवडे) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली
https://youtu.be/Oh_b9lpxPQY?si=NJx3WhT9AV-gTiq1(PCMC Crime News)आहे.
८ सप्टेंबर रोजी ही बाब निदर्शनास आली. दगडे यांच्या ताब्यातील वाहनाच्या मागील नंबरप्लेटवर आरटीओची परवानगी न घेता ती झाकता येईल, अशा पद्धतीची फ्लिपिंग यंत्रणा बसविण्यात आल्याचे आढळले. या यंत्रणेचा वापर करून नंबरप्लेट लपवून दंडात्मक कारवाईपासून बचाव करण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा संशय आहे. याप्रकरणी ९ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात (PCMC Crime News) आला.
_______________________________________________________
Pimpri Chinchwad Cyber Crime : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून ५६ वर्षीय महिलेची २१ लाखांची फसवणूक
चिंचवड : पोलिस असल्याचे भासवून महिलेच्या वडिलांनी दहशतवाद्यांना फंडिंग केल्याचे खोटे सांगत अटकेची धमकी देण्यात आली. त्यानंतर ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून ५६ वर्षीय महिलेची तब्बल २१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात (PCMC Crime News)आली.
याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एका अनोळखी व्यक्तीसह दोन बँक खात्यांच्या धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला (PCMC Crime News)आहे.
५ ते ८ सप्टेंबरदरम्यान क्विन्स टाऊन सोसायटी, उद्योगनगर, चिंचवड येथे हा प्रकार घडला. आरोपींनी पोलिस असल्याचे सांगून महिलेच्या वडिलांच्या नावाने दहशतवाद्यांना निधी दिल्याचा बनाव केला. अटक होईल तसेच ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात येईल, अशी भीती दाखवली. घाबरलेल्या महिलेने आरोपींच्या सांगण्यावरून आरटीजीएसद्वारे २१ लाख रुपये संबंधित खात्यांमध्ये वर्ग केले. फसवणूक लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार (PCMC Crime News) दिली.
______________________________________________________
भूमकर चौकात वृद्धाला हातचलाखीचा फटका; ७५ हजारांची सोन्याची अंगठी लंपास
वाकड : ‘रामाचे मंदिर कुठे आहे?’ अशी विचारणा करून दान करण्याच्या बहाण्याने ८२ वर्षीय वृद्धाच्या हातातील ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी हातचलाखीने काढून घेतल्याची घटना भूमकर चौकात (PCMC Crime News)घडली.
विठ्ठल केशव धवणे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ४० ते ४५ वर्षांच्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला (PCMC Crime News)आहे.
८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास पुना हार्डवेअर दुकानासमोर हा प्रकार घडला. आरोपीने धवणे यांना मंदिराबाबत विचारणा केली. त्यानंतर दान करण्याच्या बहाण्याने ५०० रुपयांची नोट त्यांच्या हातावर ठेवली. त्याचवेळी हातचलाखीने त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी काढून आरोपी पसार (PCMC Crime News)झाला.
_____________________________________________________
थेरगावात भावाकडून बनावट संमतीपत्राच्या आधारे मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न
थेरगाव : आईने नोंदणीकृत इच्छापत्राद्वारे मुलाच्या नावावर केलेल्या मालमत्तेवर हक्क नसतानाही भावाने बनावट मजकूर तयार करून तसेच बहिणीची बनावट सही असलेले संमतीपत्र महापालिकेत सादर केल्याचा प्रकार थेरगावात समोर आला (PCMC Crime News) आहे.
बाळकृष्ण बंकट टोपे यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचा भाऊ राजू बंकट टोपे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला (PCMC Crime News)आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आईच्या निधनानंतर इच्छापत्रानुसार संबंधित मालमत्ता त्यांच्या नावावर झाली होती. मालमत्ता कराच्या नोंदीतही त्यांचे नाव होते. असे असतानाही आरोपीने बनावट मजकूर व फिर्यादीची बनावट सही असलेले संमतीपत्र तयार करून ते महापालिकेच्या कर संकलन विभागात सादर केले. त्याद्वारे अधिकाऱ्यांची दिशाभूल करून मालमत्ता क्रमांक १०४०३०४७३४च्या नोंदीत स्वतःचे नाव समाविष्ट केल्याचा आरोप (PCMC Crime News) आहे.
______________________________________________________
काळेवाडी फाट्यावर तरुणावर पेव्हर ब्लॉकने हल्ला; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
काळेवाडी : मित्राला भेटण्यासाठी थांबलेल्या तरुणावर एका व्यक्तीने तुटलेल्या पेव्हर ब्लॉकचा तुकडा फेकून मारल्याची घटना काळेवाडी फाटा येथे घडली. या हल्ल्यात तरुणाच्या नाकाला आणि कपाळाला दुखापत झाली असून, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले (PCMC Crime News) आहे.
रोहीदास महादेव कांबळे यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओंकार श्रीनिवास नायडू याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला (PCMC Crime News)आहे.
२७ ऑगस्ट रोजी सायंकाळी अन्सारी हाडवैद्य दुकानाजवळ हा प्रकार घडला. कांबळे हे मित्राला भेटण्यासाठी थांबले असताना आरोपीचे एका व्यक्तीसोबत भांडण सुरू होते. ‘तू का येथे थांबला?’ असे म्हणत आरोपीने रागाच्या भरात पेव्हर ब्लॉकचा तुकडा कांबळे यांच्या दिशेने फेकला. तो त्यांच्या नाकाला व कपाळाला लागून त्या जखमी (PCMC Crime News)झाले.
______________________________________________________
बाणेरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर मित्राचा हल्ला; लाकडी दांडक्याने डोक्यात मारले
बाणेर : मोबाईलमधील काही गोष्टी आवडल्या नसल्याने मित्राला रूममध्ये राहू नको, असे सांगितल्याच्या रागातून २३ वर्षीय तरुणाने १९ वर्षीय तरुणीला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यात मारून तिला जखमी (PCMC Crime News)केले.
याप्रकरणी तरुणीने बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, कबीर आर्यन गुप्ता (वय २३, रा. मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला (PCMC Crime News)आहे.
१० ऑगस्ट रोजी सुस रोड परिसरातील राहत्या घरी हा प्रकार घडला. तरुणीने आरोपीचा मोबाईल पाहिला असता त्यातील काही गोष्टी तिला आवडल्या नाहीत. त्यामुळे तिने आरोपीला रूममध्ये राहू नको, असे सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपीने तिला शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यात मारून तिला जखमी (PCMC Crime News)केले.
______________________________________________________
‘आमच्याशी बोलत नाहीस’ म्हणत हल्ला; काळेवाडीत तिघांकडून तरुणाला मारहाण
काळेवाडी : ‘तू आता आमच्याशी बोलत नाहीस आणि आमच्यासोबत राहत नाहीस,’ असे म्हणत ओळखीच्या व्यक्तीने तरुणाच्या दुचाकीसमोर चारचाकी आडवी लावून त्याला मारहाण केली. त्याच्यासोबत असलेल्या आणखी दोघांनीही शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना मेडीकेअर हॉस्पिटल परिसरात (PCMC Crime News) घडली.
उमेश ऊर्फ सोनू विनोद पार्चा यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सनी ऊर्फ नितीश राकेश सौदाई, सुशिल सुरेश टाक आणि दीपक ऊर्फ बाबू बेद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला (PCMC Crime News)आहे.
९ सप्टेंबर रोजी रात्री दीडच्या सुमारास पार्चा दुचाकीवरून जात असताना सनी याने त्याच्या चारचाकी वाहनाने दुचाकीसमोर आडवे वाहन लावले. त्यानंतर बोलत नसल्याच्या कारणावरून सनीने त्यांच्या तोंडावर व उजव्या कानावर मारहाण केली. सुशिल टाक आणि दीपक बेद यांनीही शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद (PCMC Crime News) आहे.
______________________________________________________
पुणावळेत टँकरची दुचाकीला धडक; २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
पुणावळे : भरधाव आणि बेदरकारपणे पाण्याचा टँकर चालवून दुचाकीला समोरून धडक दिल्याने २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. पुणावळे गावठाण परिसरात ९ सप्टेंबर रोजी पहाटे हा अपघात (PCMC Crime News) झाला.
निखिलसिंग प्रविणसिंग सिसोदिया यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टँकरचालक महादेव रमाकांत किडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला (PCMC Crime News) आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पहाटे अडीचच्या सुमारास दर्शले चौकाच्या दिशेने येणाऱ्या दहा टायरी टँकरने समोरून येणाऱ्या दुचाकीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात अर्पित प्रविणसिंग येवतिकर (वय २१) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांचा मृत्यू झाला. टँकरचालकाच्या बेदरकारपणामुळे अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले (PCMC Crime News)आहे.
