(पिंपरी, प्रतिनिधी ): कासारवाडी आणि फुगेवाडी येथील रेल्वे फाटक बंद करण्याच्या प्रशासकीय हालचाली सुरू असताना नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे व महापालिका अधिकाऱ्यांसह दोन्ही ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. कासारवाडी येल रेल्वे फाटकाच्या जागी भुयारी मार्ग उभारण्याबाबत त्यांनी संधित अधिकाऱ्यांना सूचना (Kasarwadi Railway Gate) दिल्या.
सरवाडी येथील पाहणीवेळी रेल्वे विभागाचे शुभम निकम, हपलिकेच्या सहशहर अभियंता प्रेरणा शिनकर, कार्यकारी अभियंता विजय भोजसेविका मनीषा लांडे, प्रतीक्षा जवळकर, माजी नगरसेवक शाम लांडे, प्रकाश जवळकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. फुगेवाडी येथे नगरसेवक राजू बनसोडे, माजी नगरसेविका उषा वाखारे, युवासेना जिल्हाप्रमुख सागर पाचरणे, शिवसेना शहर संघटक निलेश हाके यांच्यासह नागरिक उपस्थित (Kasarwadi Railway Gate)होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, रेल्वे मार्गामुळे कासारवाडी गावाचे दोन भाग झाले आहेत. स्मशानभूमी आणि शाळा रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या बाजूला असल्याने नागरिक तसेच विद्यार्थ्यांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ही गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे फाटकाच्या ठिकाणी भुयारी मार्ग उभारण्याबाबत पाहणी करण्यात आली (Kasarwadi Railway Gate) आहे.
फुगेवाडी येथे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गासाठी प्रस्तावित अंडरपासच्या कामाचीही पाहणी करण्यात आली. दोन्ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. अंडरपासचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने आवश्यक सहकार्य करावे, अशी विनंतीही करण्यात (Kasarwadi Railway Gate) आली.
कासारवाडी आणि फुगेवाडी येथील भुयारी मार्गांची कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिक, विद्यार्थी तसेच परिसरातील रहिवाशांची ये-जा अधिक सुरक्षित आणि सुलभ होण्यास मदत होणार (Kasarwadi Railway Gate) आहे.
