पुणे : शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, बॉटनी विषयात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित विद्यार्थिनीवर झालेल्या कथित विनयभंगामुळे ती गंभीर मानसिक तणावाखाली होती, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली (PhD Student Sucide) आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी ११ एप्रिल रोजी तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली. या घटनेनंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीत Botanical Survey of India येथील एका प्राध्यापकावर विनयभंगाचा गंभीर आरोप करण्यात आला (PhD Student Sucide)आह
कुटुंबीयांच्या मते, संबंधित प्राध्यापकाकडून झालेल्या वर्तनामुळे विद्यार्थिनी मानसिकदृष्ट्या खचली होती. या त्रासातूनच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला (PhD Student Sucide)आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित प्राध्यापकाला अटक केली आहे. त्याच्याविरोधात विनयभंग तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून (PhD Student Sucide)पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात संतापाची लाट उसळली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची (PhD Student Sucide)मागणी होत आहे.
