पिंपरी-चिंचवड : सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने एका महिलेला अटक करून सुमारे ८ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले (Sangvi Police) आहेत.
सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६८/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) व ३३१(३) अन्वये २५ फेब्रुवारी २०२६ रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी केल्याची तक्रार होती. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट-१ कडे सोपविण्यात(Sangvi Police) आला.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील २०० ते २५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही चोरी एका महिलेने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी सुमन दत्ता लोंढे (वय ३५, रा. रामनगर, वारजे माळवाडी, पुणे) हिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने चोरीची कबुली दिल्यानंतर तिच्याकडून सुमारे ८ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात (Sangvi Police) आले.
अधिक तपासात आरोपी महिलेने ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या आणखी एका घरफोडीची कबुली दिली असून सांगवी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ४३४/२०२५ देखील उघडकीस आला आहे. तपासात असेही समोर आले की, अनेक नागरिक घराबाहेर जाताना चावी घराबाहेर लपवून ठेवतात, याचा फायदा घेत आरोपी महिला चावी शोधून घरफोडी करत (Sangvi Police) होती.
ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे व त्यांच्या पथकाने (Sangvi Police) केली.
