पिंपरी-चिंचवड:महानगरपालिका निवडणुकीपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांची गुप्त भेट घेतल्याची पुष्टी सूत्रांनी दिली आहे.पक्षाने पिंपरी-चिंचवडची जबाबदारी अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांच्याकडे सोपविल्यानंतर हा महत्वाचा संवाद पार पडल्याची माहिती (NCP alliance ) आहे.
या बैठकीत प्रमुखपणे खालील मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते:
• दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्यास पिंपरी-चिंचवडमध्ये जागावाटप कसे होणार?
• अजित पवार गट आणि शरद पवार गटातील इच्छुकांचा दावा असलेल्या प्रभागांतील तिढा कसा सोडवायचा?
• चार सदस्यीय प्रभागांत एकत्र उमेदवार देताना एकच चिन्ह वापरायचे का?
• काही प्रभाग तुतारी चिन्हावर आणि काही घड्याळ चिन्हावर लढवण्याचा पर्याय?
• दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताना महाविकास आघाडीतील घटक पक्षांना देखील सोबत घेण्याचा आग्रह
• मविआमध्ये कोणतीही फूट पडू नये, यासाठी रणनीती आखण्याची (NCP alliance )गरज
शरद पवार गटाचा स्पष्ट आग्रह आहे की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना सोबत घेणे अपरिहार्य आहे. मात्र हा प्रस्ताव अजित पवार गट स्वीकारणार का?, हे आगामी राजकीय समीकरण ठरवणारे ठरणार (NCP alliance )आहे.
पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे राजकारण आगामी निवडणुकीत निर्णायक मानले जात असताना या बैठकीकडे राजकीय वर्तुळात मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात (NCP alliance )आहे.
