प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या चिखली प्रभाग क्रमांक १ मधील देवभूमी हौसिंग सोसायटी, चिंचेचा मळा, अष्टविनायक चौक परिसरात चार अनधिकृत बांधकामे आढळून आली आहेत. याप्रकरणी मनपा प्रशासनाने संबंधित बांधकामधारक व विकासकांना २५ फेब्रुवारी २०२६ रोजी नोटिसा बजावून स्वतःहून बांधकाम हटविण्याच्या सूचना दिल्या (Chikhali Illegal Construction) होत्या.
सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयामार्फत १८ मार्च २०२६ रोजी सुमारे ६०० चौ.मी. क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. मात्र, त्यानंतरही संबंधितांनी बांधकाम सुरूच(Chikhali Illegal Construction) ठेवले.
यानंतर १६ एप्रिल २०२६ रोजी पुन्हा कारवाई करण्यात आली. यावेळी काही बांधकामधारक, विकासक व व्यावसायिकांकडून विरोध करण्यात आला. तरीही अनधिकृत कामे सुरूच राहिल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेत संबंधित चार बांधकामधारक व विकासकांविरुद्ध एमआरटीपी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल केले (Chikhali Illegal Construction) आहेत.
मनपा प्रशासनाने अनधिकृत बांधकामांविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला (Chikhali Illegal Construction) आहे.
