(पिंपरी, प्रतिनिधी ): पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी फसवणूक, मारहाण, चोरी, अपघात आणि अमली पदार्थ बाळगल्याच्या आठ घटना समोर आल्या आहेत. वाकडमध्ये एटीएम कार्ड बदलून वृद्धाची ३० हजार रुपयांची फसवणूक झाली, तर पिंपरी व चाकण परिसरात एमडी व गांजा बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. विविध पोलीस ठाण्यांत याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले (Pcmc Crime News)आहेत.
वाकडमध्ये एटीएम कार्ड बदलून वृद्धाची फसवणूक
वाकडमधील डांगे चौक परिसरात आरोपीने एटीएममध्ये पैसे काढणाऱ्या ६३ वर्षीय वृद्धाची दिशाभूल करून त्यांचे कार्ड बदलले. तसेच पिन क्रमांक लक्षात ठेवून दुसऱ्या एटीएममधून ३० हजार रुपये काढले. याप्रकरणी उत्तम कुटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल(Pcmc Crime News) आहे.
दिघीत सोसायटी सदस्याला मारहाण; ॲट्रॉसिटीचा गुन्हा
दिघीतील कमलराज सोसायटीमध्ये जुन्या ऑडिटच्या वादातून एका सदस्याला मारहाण व जातीय अपशब्द वापरल्याचा प्रकार घडला. राजू कांबळे यांच्या फिर्यादीवरून मंगेश सावंत, सतीश वाळके आणि शंकर पोखरकर यांच्याविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला (Pcmc Crime News) आहे.
नाशिक फाट्यावर तरुणावर दगडाने हल्ला
नाशिक फाटा परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून देवराज बनपट्टे यांना दोघांनी मारहाण केली. त्यानंतर एकाने दगडाने त्यांच्या डोक्यात प्रहार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना पाच ते सहा टाके पडले. किरण साळुंके आणि सनी जोजन यांच्याविरुद्ध दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला(Pcmc Crime News) आहे.
हिंजवडीत १.४० लाखांची कॉपर वायर चोरी
माण रोडवरील गृहप्रकल्पाच्या स्टोअर रूमचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख ४० हजार रुपये किमतीची कॉपर वायर चोरून नेली. संदीप कदम यांच्या फिर्यादीवरून हिंजवडी पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला(Pcmc Crime News) आहे.
तळेगाव दाभाडेत दुचाकी चोरी
तळेगाव दाभाडे येथील अमोल रेसिडेन्सीच्या पार्किंगमधून २० हजार रुपये किमतीची होंडा शाईन दुचाकी चोरीला गेली. धरमबीर पासी यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला (Pcmc Crime News) आहे.
चिंचवडमध्ये दुचाकी अपघातात तरुण जखमी
चिंचवडच्या श्रीधरनगर परिसरात भरधाव अॅक्टिव्हा चालवताना अचानक ब्रेक दाबल्याने मागे बसलेला तरुण रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. दर्शन मिसालोलू याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला (Pcmc Crime News)आहे.
पिंपरीत १.७४ लाखांचे एमडी जप्त; दोघे अटकेत
संत तुकारामनगर येथील एच.ए. मैदानावर पोलिसांनी कारवाई करत १ लाख ७४ हजार ९०० रुपये किमतीचा मॅफेड्रोन (एमडी) जप्त केला. ओम माते आणि साज शेख यांना अटक करण्यात आली असून अथर्व टाकसाळे याच्याविरुद्धही एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला(Pcmc Crime News) आहे.
चाकणमध्ये ५६२ ग्रॅम गांजासह तरुणाला अटक
नाणेकरवाडी परिसरात पोलिसांनी कारवाई करून कृष्णा सवराते याला अटक केली. त्याच्याकडून २८ हजार १०० रुपये किमतीचा ५६२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला (Pcmc Crime News) आहे.
